तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची पालकमंत्री यांचेकडे मागणी
दोडामार्ग
तालुक्यातील ग्रामीण भागात आजही नेटवर्क नसल्याने आँनलाईन कामासाठी शाळेचे मुख्याध्यापक लिपिक यांना तालुक्याचा ठिकाणी जावे लागते यासाठी महानेटच्या माध्यमातून ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्यानें केबलच्या व्दारे पोल वरून ठीक ठिकाणी कनेक्शन साठी लाईन टाकण्यात आली आहे तरी सदर लाईंनची इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक गावात जोडणाऱ्या केबल नेटवर्क व्दारे ग्रामपंचायती प्रमाणे प्राथमिक माध्यमिक,शाळाना कनेक्शन जोडण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन दोडामार्ग तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर यांनी पालकंमत्र्यांकडे दिले आहे यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर हेही उपस्थित होते
दोडामार्ग तालुक्यातील काही डोंगराळ भागात नेटवर्क नसल्याने अनेक अडचणी येत आहेत लोकांना पोस्टात रेशन दुकान तलाठी कार्यालय ग्रामपंचायत आदींना आँनलाईन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो तसेच वेळ व पैसा ही खर्च होतो त्या प्रमाणे ग्रामीण भागातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,लिपिक, यांनाआँनलाईन कामासाठीच वारंवार नेटवर्क नसल्याने दोडामार्ग येथे जावे लागते तसाच त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो तसेच वेळेतही कामे मार्गी लागत नाही प्रशासनास महत्वाची माहिती आँनलाईन पाठविणे आवश्यक असते त्या प्रमाणे शाळा स्तरावरील सर्व कामे करणे यासाठी आवश्यक कनेक्शन नेटवर्क प्रशालेत मिळाल्यास त्याचां लाभ शाळेत विदयार्थी सह शिक्षकांना होणारं आहे तरी याबाबतीत प्रशासनानं शाळेत द्यावे ज्याप्रमाणे महानेट कनेक्शन महाआँनलाईन सेवा आरोग्य विभाग, सेतू ,ग्रामपंचायत ,तलाठी, कार्यालयात आदींना पाच कनेकटिव्हिटी देण्यात येणारं आहे ती डायरेक्ट तालुक्याला जोडण्यात येणार असल्याने स्पीड मिळणार आहे तसेच कामे जलद मार्गी लागतील असे त्यांनी सार्व. बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे याबाबतीत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पालकंमत्र्यांनी दिले असल्याची माहिती शाबी तुळसकर यांनी दिली आहे