*भाजपा नेते निलेश राणे यांच्या सुचनेनंतर प्रशासनाकडून कार्यवाही*
सिंधुदुर्गनगरी :
भाजपा नेते निलेश राणे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गनगरी येथे आले असता स्थानिक व्यावसायिक महिलांकडून प्राधिकरणातील बंद पथदिव्यांबाबत आपली समस्या मांडली होती. प्राधिकरणातील अनेक पथदिवे बंद असून त्यामुळे सगळीकडे अंधाराचे साम्राज्य आहे या बाबत लवकरात लवकर उपाययोजना करा अशी मागणी स्थानिक व्यावसायिक असलेल्या तेंडुलकर यांनी मांडली होती. याबाबतर निलेश राणे यांनी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना पत्र देत पथदिवे चालू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्या नंतर आज नायब तहसीलदार विजय वरक यांनी प्राधिकरणातील बंद दिव्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणू इ-निविदा प्रसिद्ध करत या दिव्यांच्या दुरुस्तीसाठी कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिशन व मदतनीस प्रत्येकी एक पद भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या मुळे प्राधिकरणातील बंद दिव्यांची समस्या सुटणार असून देखभाल दुरुस्तीची कामे पूर्वीपेक्षा आधील लवकर करणे शक्य होईल.