You are currently viewing भूताखेतांच्या गोष्टी ..

भूताखेतांच्या गोष्टी ..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

*भूताखेतांच्या गोष्टी ..*
(क्रमांक ३)

या दुसऱ्या कथेनंतर त्याच्याच अनुषंगाने त्याच *कलेढोण* गावी मी स्वतः 20 वर्षानंतर म्हणजे अगदी तरुणपणी माझ्या आतेबहिणीच्या लग्नाला जावा ( यझदी ) मोटरसायकल वरुन माझ्या भावाला घेवून गेलो होतो , घरची बाकी सर्व मंडळी एसटी बसने आधीच गेली होती ..साताऱ्यापासून सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास होता ..लग्नकार्य वगैरे इतर सर्व समारंभ उरकल्या नंतर रात्री ९ च्या सुमारास मुक्काम करायचे सोडून आम्ही आता परत सातारला निघालो असे सांगीतले तेंव्हा घरातील सर्वच बुजुर्ग लोकांनी आता रात्र झाली आहे ,बआता तुम्ही जावू नका असे सांगीतले त्यामध्ये यापुर्वीच्या दुसऱ्या कथेतील जे राजारामबापू होते , त्यांनी देखील तुम्ही मुलांनो आता जावू नका . उद्या सकाळी लौकर जावा असे सूचविले …(खरं आम्ही राहिलो असते तर चालले असते , असे अगदी रातोरात परत सातारला फिरण्याचे काही महत्वाचे काम नव्हते ) ..पण तारुण्याची एक धुंदी होती ! आम्ही , आम्हाला जावेच लागेल थांबता येणारच नाही असे सांगून कुणाचेही अगदी आईवडिलांचेही न ऐकता , अगदी हट्टाने निघतो सांगून गाडीला किक मारून निघालो .२५ किलोमीटर वर आल्यावर नेमक्याच त्याच बापुंनी सांगितलेल्या गोष्टितील *कानकात्रजच्या* ओढयाजवळ माझी गाडी अलिकडेच बंद पडली साधारणतः रात्रीचे १० वाजले असावेत . सर्वत्र अंध:कार खेड़यात तेंव्हा कुठली लाईट ? बर गाडित पेट्रोल , हवा सर्व ओके आहे ! आम्ही दोघा भावांनी गाडी सुरु करण्यासाठी खुप प्रयत्न केले . १०० किक्स मारून झाल्या पण गाडी काही सुरु झाली नाही , पूर्ण काळोख काही दिसत नव्हते …रस्त्याला चिटपाखरू नाही अगदी शांतता , निर्जन .. शिवाय *तो नेमका कान कात्रजचा ओढा* आणि पूलाच्या मध्यावर गाडी बंद पडलेली , आम्ही घाबरलो खरे ! मग त्यावेळी बापूंनी सांगितलेली आणि लहानपणी ऐकलेली गोस्ट आठवली अन गाळण उडाली आणि त्या भीतीपोटीच आठवले की ” अरे ओढयाच्या अलिकडेच आपली गाडी बंद पडली आहे .. आपण पुल क्रॉस करून पुढे जावुया , मग आम्ही गाड़ी ढकलून अलीकड़ून पलीकडे जावा मोटरसायकल नेली , दोघांचीही भीतिने पूर्ण गाळण उडाली होती . घरच्या लोकांचे ऐकले असते तर खुप बरे झाले असते असे वाटले .. ! पलीकडे आल्यानंतर विनासायास गाडी ढकलून स्टार्ट झाली ,( *कानकात्रजच्या ओढयात पुलावर मात्र गाडी खुप प्रयत्न करून देखील बिलकुल सुरु झाली नव्हती* ) याचाच अर्थ त्या परिसरात ती भूतबाधा किंवा त्या ( *हदळ पिशाच्याचीच हद्द होती ,याचा अनुभव आला.* ) पण गाडिचा ब्रेक फैल झाला होता . पण रस्त्याला वरदळ कमी असल्यामुळे आम्ही कसे तरी रात्री वडुजला पोहोचलो .. ते खेडेगाव तिथेही त्यावेळी लाईट नाही. पण गाड़े म्हणून एक आमच्या परिचित असलेले ग्रामसेवक होते .. त्यांना रात्री उठवले त्याच्या मदतीने रात्री एक मेकॅनिकला गाठून बॅटरीच्या उजेडात गाडिचा ब्रेक कां लागत नाही ते पाहिले तर किक्स मारतांना झटक्यामुळे ब्रेककेबल ही एका हुक मधून निसटली होती ..ती ओके केली , ब्रेक ओके झाले . पण त्या *कानकात्रजच्या* ओढयातील घटनेमुळे आता रात्री १२ नंतर पुढे सातारला जाण्याची इच्छया झालीच नाही भिती मनात बसली होती. त्या ग्रामसेवकाने देखील तुम्ही आता बिलकुल जावू पुढे जावू नका असे सांगितले कारण पुढे पुसेगाव जवळील वर्धनघाटात देखील रात्री असे अनुभव आले आहेत . तुम्ही आता इथे मुक्काम करा व पहाटे पुढे जा असे सांगीतले , मग त्यादिवशी आम्ही वडुजला मुक्काम केला व दूसरे दिवशी सकाळी सातारला परतलो ही सत्य कथा …..असे अनुभव येतात ….
बुजुर्ग लोक जे सांगतात त्यात निश्चित तथ्य असते हे मात्र खरे. आता खूपच बदल झाले आहेत . ( पण रात्री अपरात्री कधीही एकट्याने प्रवास करू नये म्हणतात.
*©विगसा*
.👍👍👍

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा