You are currently viewing राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ओम जगतापचे यश 

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ओम जगतापचे यश 

इचलकरंजी / प्रतिनिधी

 

संगमनेर येथे घेण्यात आलेल्या चौथ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ९ ते १४ वयोगटामध्ये ओम रणजीत जगताप याने रिदमिक या प्रकारात व्दितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला आहे. तो सोहम योग अकॅडमी येथे योगाचा नियमित सराव करतो. त्याने यापूर्वी देखील विविध ठिकाणच्या योगासन स्पर्धेत योगासनातील विविध प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण करुन भरीव यश संपादन केले आहे. तो सोहम योग अकॅडमीचा खेळाडू असून रवी अकॅडमीचा विद्यार्थी आहे. त्याला या यशासाठी राष्ट्रीय योग प्रशिक्षक सुहास पोवळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ओम जगताप याचे क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेञातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा