You are currently viewing खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर द्या- आ. वैभव नाईक

खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर द्या- आ. वैभव नाईक

*खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर द्या- आ. वैभव नाईक*

*खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश*

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांतील प्रलंबित सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. नियमितपणे कर्जाची परतफेड करून देखील सबसिडी मिळाली नाही.त्यामुळे नागरिकांना नवीन कर्ज प्रकरणे करता येत नाहीत त्याचबरोबर बँक देखील एनओसी देत नाहीत. याकडे आ. वैभव नाईक यांनी रविंद्र साठे यांचे लक्ष वेधत कर्ज प्रकरणाची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर रविंद्र साठे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकरात लवकर जमा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

 

*संवाद मिडिया*

*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*

*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.

*श्री आशिष लोके*

*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा