You are currently viewing म.भा.चव्हाण या थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करुन माझे हात पवित्र झाले __ कामगार भुषण पुरुषोत्तम सदाफुले

म.भा.चव्हाण या थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करुन माझे हात पवित्र झाले __ कामगार भुषण पुरुषोत्तम सदाफुले

म.भा.चव्हाण या थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करुन माझे हात पवित्र झाले __ कामगार भुषण पुरुषोत्तम सदाफुले

(मुक्त प्रतिनिधी : आत्माराम गोविंदराव हारे)

पिंपळे गुरव : काव्यात्मा साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान सोहळा _२०२३ मराठवाडा जनविकास मंचाचे सभागृह पिंपळे गुरव येथे संपन्न झाला.यावेळी मान्यवर म्हणून महाराष्ट्र कामगार भुषण प्राप्त कवी पुरुषोत्तम सदाफुले, स्नेहछाया परिवाराचे संस्थापक दत्तात्रय इंगळे आणि काव्यात्मा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष संजय साळुंखे होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व वृक्षपुजन करुन मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण यांना काव्यात्मा साहित्य भुषण पुरस्कार , सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांना काव्यात्मा वृक्षमित्र पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघ यांना काव्यात्मा युवा वृक्षमित्र पुरस्कार, नवनाथ केंदळे यांना काव्यात्मा आदर्श शिक्षक पुरस्कार, पितांबर लोहार यांना काव्यात्मा आदर्श पत्रकार पुरस्कार, आणि गझलकार ,कवी दिनेश भोसले यांना काव्यात्मा साहित्यसेवा पुरस्कार वरील सर्व पुरस्कारर्थींना महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद व इतर साहित्य संघटनेत हिरहिरीने काम करणारे पुरुषोत्तम सदाफुले मामा आणि दत्तात्रय इंगळे (स्नेहछाया परिवार) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सर्व पुरस्कारर्थीनी मनोगत व्यक्त केले.यात म.भा.चव्हाण म्हणाले ,” वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करणे ही खरी मानवतेची सेवा आहे म्हणूनच मराठवाडा जनविकास मंचाचे कार्य खुप मोठे आहे ,परंतू वृक्षलागवड करुन वृक्षांचे संवर्धन करणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान काव्यात्मा साहित्य परिषद करते याचा मला आनंद होतोय.पुढे म.भा. म्हणाले :
ज्यांना कुणीच नाहीत
मुले बाळे ही नाहीत
त्यांनी त्यांच्या वंशासाठी
झाडे लावावीत…
देशातील एकसंघटितपणा टिकून राहण्यासाठी लिखाणात प्रादेशिकता असू नये असे मतही मांडले.
मला वंचित मुलांसाठी काम करताना समाजातील दानशूर लोक मदत करतात म्हणून हातून चांगले काम केल्याचे समाधान मिळत आहे असे दत्तात्रय इंगळे यांनी सांगितले.
अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, ” वाटेत कितीही अडथळे आले तरी हार मानायची नाही.निष्ठा आणि प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चितच आनंद मिळतो आणि तोच आनंद जीवनात कायम जगण्याची प्रेरणा देतो.काव्यात्मा साहित्य परिषदेची छान सुरुवात झाली आहे.
समाज आळणी होत चाललाय, मिठातला खारटपणा कमी होत आलाय.म.भा.चव्हाण या थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करुन माझे हात पवित्र झाले अशा भावना पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केल्या.
काव्यजागर संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या जवळपास ५० कवी, कवयित्रीनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या.याचं काव्यजागर संमेलनातून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष असणारे पुरुषोत्तम सदाफुले यांनी स्वतः परिक्षण करुन १ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या कार्यक्रमात ग.दि.मा.काव्य पारितोषिकासाठी पाच उत्कृष्ट कवींची निवड केली यात कवी पांडुरंग बाणखेले (प्रथम क्रमांक),कवी अनिल नाटेकर (द्वितीय क्रमांक), कवयित्री जयश्री श्नीखंडे(तृतीय क्रमांक)
,कवी वसंत घाग आणि कवी आय के शेख यांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी) पारितोषिक प्राप्त कवी, कवयित्रींचा काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे यांच्या हस्ते सन्मानित केले.या कार्यक्रमासाठी संयोजनात सुरेखा हारे , मुरलीधर दळवी आणि मराठवाडा जनविकास मंचाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.याचं बरोबर सहभागी झालेल्या कवी , रसिकांना मराठवाडा जनविकास मंचाने वृक्षरोपांचे वाटप केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साळुंखे, सुत्रसंचालन कवी सुभाष चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन कवी आत्माराम हारे यांनी केले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा