You are currently viewing बांदा आरोग्य केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमा

बांदा आरोग्य केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमा

बांदा आरोग्य केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमा…

उपसरपंचांसह शहराध्यक्षांची मागणी; आमदार नितेश राणेंची घेतली भेट…

बांदा

रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. आमदार राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या संपर्क साधत वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले अडीच महिने हे पद रिक्त आहे. याठिकाणी सर्वाधिक ओपिडी असून टेलिमेडिसिन केंद्र देखील आहे. बांदा हे महामार्गावरील महत्वाचे केंद्र असून याठिकाणी प्रसूती गृह आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे.

एमबीबीएस अधिकारी नसल्याने रुग्ण, नातेवाईक व विद्यार्थी यांना दाखले मिळविण्यासाठी सावंतवाडी किंवा ओरोस येथे जावे लागते. यामध्ये वेळ व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी विनंती आमदार राणे यांच्याकडे करण्यात आली. डॉ. धुरी यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार राणे यांना दिले.

यावेळी उपसरपंच श्री खतीब, श्री. काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, निलेश कदम, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा