*जनतेच्या विश्वासास कधीही तडा जाऊ देणार नाही -आ. वैभव नाईक*
कुडाळ महिला बाल रुग्णालय हे आ. वैभव नाईक यांचे आदर्शवत काम – संजय पडते
कुडाळ :
देशात महागाईचा भडका उडाला आहे. मोदींनी देशातील जनतेला अच्छे दिनांचे स्वप्न दाखवून जनतेची निव्वळ फसवणूक करण्याचे काम मोदी सरकराने केले आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता मोदींना अच्छे दिनाचे धडे शिकवेल. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. कित्येक वर्षे प्रलंबित असलेली कामे आ. वैभव नाईक यांनी मार्गी लावली आहेत. त्यामध्ये आंबेरी पूल, मांडकुली पूल, मतदारसंघातील विविध रस्ते या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. कुडाळ येथील महिला बाल रुग्णालय हे आ. वैभव नाईक यांचे आदर्शवत काम आहे. इतर आमदारांनी गद्दारी केली असली तरी आ. वैभव नाईक निष्ठावंत राहिले. त्यांच्यावर एसीबीची चौकशी लावण्यात आली मात्र तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सांगितले.
आमदार वैभव नाईक यांच्या गाव भेट दौऱ्याची बैठक पिंगुळी शेटकरवाडी येथे संपन्न झाली यावेळी त्यांनी पिंगुळी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. विकास कामांचा आढावा घेतला.संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीला ग्रामस्थांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला.
आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ मालवण मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांनी कोणतीही अपेक्षा न बाळगता माझ्यावर विश्वास ठेवून दोन वेळा आमदार केले. जनतेच्या विश्वासास तडा जाऊ न देणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे कितीही आमिषे आली तरीही मी शेवट पर्यंत उद्धवजी ठाकरेंची साथ सोडणार नाही. आज मी जो कोणी आहे तो केवळ शिवसेना पक्षाने संधी दिल्यामुळे आणि जनतेच्या आशिर्वादामुळेच हि जाणीव कधीही विसरणार नाही.मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर,उपतालुका प्रमुख मिलींद परब, राजू गवंडे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर,माजी सरपंच निर्मला पालकर,ग्रा. प. सदस्य महेश पालकर, ग्रा. पं. सदस्य तुळशीदास पिंगुळकर, शाखा प्रमुख आनंद काराणे,युवासेना विभागप्रमुख सिद्धार्थ धुरी, माजी युवासेना विभाग प्रमुख हेमंत पिंगुळकर बबलू पिंगुळकर, शोहेब खुल्ली,सतीश धुरी, शाखा प्रमुख चेतन राणे, शाखा प्रमुख गौरव वराडकर,शाखा प्रमुख अशोक बावलेकर, शाखा प्रमुख विजय मोरये,शाखा प्रमुख आदेश धुरी, शाखा प्रमुख दीपक धुरी, कपिल म्हापसेकर, चेतन राऊळ आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.