*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री.वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*जीवन*
************
*ठेविले अनंते तैसेची रहावे , चित्ती असावे समाधान… ही उक्ती जीवन जगताना सार्थ आहे.*
मानवी जीवन भगवंताचा प्रसाद आहे. भगवंताची कृपा आहे. त्याच्यावर अनंत श्रद्धा असावी हे ही तितकेच खरे…!
संचित , सत्कर्म , प्रारब्ध , भोग , सुख , दुःख , संवेदनां असे जीवनाचे अनेक कंगोरे आहेत. जीवनाच्या वाटचालीची सुखद सांगता ही उत्तम संस्कारित आणि विवेकी वैचारिकतेवर निर्भय असते… !
*ती निर्भयता आपल्या निर्मोही आचरणातुन प्रत्ययास येत असते. हे खरे..!*
भगवंतावरील अढळ निष्ठा म्हणजे एक सुंदर श्रद्ध्येय नि:श्वास असतो. त्यातूनच निर्गुण ,निराकार अशा अनंतातील मोक्षमुक्तीचे दर्शन सदैव होत असते…..!!
उमलणे , फुलणे , गंधाळणे , मुरझणे , निर्माल्य होणे ही निसर्गाची प्रकृती आहे आणि ते सूंदर साक्षात्कारी सत्य असते..आणि त्या सत्यात ईश्वराची कल्याणप्रद साक्षात्कारी अनुभूती असते… आणि अंतिम निर्मळ सुंदर सात्विक सुख म्हणजे दैवयोगी मनःशांती असते..
निसर्गातील अणूरेणुत देवत्वाचा अंश आहे. आपण जाणीवपूर्वक डोळे उघडले आणि समोर पाहिले , डोळसपणे अंतर्मुख झालो तर त्या अतर्क्य , अनाकलनीय अनामीकाचा साक्षात्कार झाल्याशिवाय रहात नाही.
त्यासाठी मन नितळ ,स्वच्छ , पारदर्शी असावे लागते. जीवनातील सुंदरतेचा , सुखानंदाचा निष्काम निर्मोही शोध घेण्याचा अंतरीक ध्यास असावा लागतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून नैराश्याच्या विकाराचा , असूयेचा त्याग करुन जीवनाचा प्रेमास्थेने स्वीकार केला पाहिजे हे मात्र खरं ..!
विवेकी सतर्कता , कल्याणकारी , सौख्यकारी अशा समाधानी मानवी जीवनमूल्यांचा प्रगल्भ संस्कार जीवनावर कसा होत राहील याचा विचार प्रत्येकाने सातत्याने केला पाहिजे.. जीवनाला सामोरे गेले पाहिजे….
जीवन एक सुंदर प्रवास आहे.. तो चालत रहावाच लागतो हे वास्तव आहे.
जीवनानंद कसा घ्यावा हे विवेकाधीष्ट आहे. आत्मसुख , आत्मानंद , सात्विक संस्कार आहे. भौतिक सुखाची लालसा ही क्षणिक आहे.
*प्रेमवात्सल्याचे ऋणानुबंध ही विलक्षण अक्षयी मनःशांती आहे आणि तीच जगण्यासाठी अनिवार्य आहे.*
निसर्ग हाच मनभावनांचा सुंदर साक्षात्कार आहे. त्यात आपण सर्वांनी समरस होणे म्हणजेच तुप्तकृतार्थ जगणे आहे…
अनेक प्राचीन वेदकालीन , धार्मिक धर्मग्रंथातून , संतवाङ्मयातून अनेक विचारवंतांच्या कडून , अनेक विद्वान साहित्यकारांच्या लेखनातून सर्वार्थाने जीवनावर सर्वतोपरी भाष्य गेले केले आहे. आजही होत आहे.
” *कां चिंतामणी जालिया हातीं ।*
*सदा विजयवृत्ती मनोरथी ।*
*तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ती ।*
*ज्ञानदेवो म्हणे ।।*
*मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथांच्यामुळे मी पूर्ण काम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत आहेत असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात…..!!!*
प्रत्येकाला आपल्याला जीवनात सुख समाधान मिळावे , तृप्तता लाभावी असे वाटत असते. त्यासाठी आपले सत्कर्म आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवून केले पाहिजे.
आपण समाजात रहात असताना समोर आलेली कर्तव्ये , जगव्यवहार करतो , काही निर्णय देखील घेतो. जगतानां अनेक परिचित , अपरिचित , सुष्ट तर कधी दुष्ट व्यक्ती यांच्याशी आपला संपर्क येतो त्यातुन अनेक चांगल्या वाईट घटनांना सामोरंही जावं लागतं तेंव्हा आपलं मानसिक संतुलन अबाधित असणं हे अत्यन्त महत्वाचे असते. त्यावेळी आपली कर्तव्ये अत्यन्त प्रामाणिक पणे सारासार विवेकी विचार करून पार पाडावीत. आपले सारे व्यवहार अनैतिकतेचा त्याग करून नैतिकतेने सत्कर्माला स्मरून करीत रहाणे गरजेचे आहे. अशा संस्कारित , सोज्वळ , संयमी आचराणामुळे *मन सदैव प्रसन्न रहाते,* जीवन जगणे सुलभ सुखकारक होते..
” *मन करा रे प्रसन्न* *सर्व सिध्दीचे कारण।।*
याची प्रचिती येते.
*निष्कर्ष*……..
*जीवन जसे असते तसे प्रारब्ध भोगानुसार जगावे लागते हा नग्न दृष्टांत आहे.*
*फक्त जगताना विवेकाने सत्कर्म करीत जगावे , अंतरात निष्काम प्रेमभावनां शेवटपर्यंत जपत रहावी हाच एक मूलमंत्र आहे हे मात्र खरं..!!!*
यालाच सत्कर्म , पुण्यकर्म म्हणतात.
*इती लेखन सीमा*…..
*©️.वि.ग.सातपुते.*
*अध्यक्ष:- महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, मुंबई , ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट्र )*
*📞 ( 9766544908 )*
*दिनांक : १२ऑगस्ट २०२३*
*(बेंगलोर )*
*संवाद मिडिया*
*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃♀️🏃♂️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*
*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*
*👗किया फॅशन👘*
*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*
*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*
*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*
*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*
*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*
*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*
*📲संपर्क:-*
*9403920802*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*