You are currently viewing परुळे येथे दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

परुळे येथे दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला:

 

श्री महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय परुळे आणि काळसे पंचक्रोशी दिव्यांग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वराठी मंगल कार्यालयात झालेल्या या शिबीरात परुळे पंचक्रोशीतील २५ लाभार्थींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबीरात डॉ. शाम राणे,(कान,नाक,घसा तज्ञ), डॉ. कौस्तुभ देशपांडे (नेत्रतज्ञ), निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक तसेच एस.एस.पी.एम.लाईफटाईम हाॕस्पिटल, पडवे सिंधुदुर्ग चे अधिष्ठाता मा. डॉ. श्री. आर. एस. कुलकर्णी यांनी रुग्णांची तपासणी केली. या तपासणीमधे आवश्यक असणा-या रुग्णांची पुढील तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कानाचे यंत्र आणि ईतर उपचारही करण्यात येतील.

तसेच दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि बदललेले नियम यासंबंधी आॕडिआॕलाॕजिस्ट श्री.श्रीधर पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबीरातील सर्व लाभार्थींना शिवसेना उप तालुकाप्रमुख श्री. सचिन देसाई यांजकडून अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी डॉ. उमाकांत सामंत, डॉ. प्रशांत साळगांवकर, श्री. विनोद धुरी, श्री. जयवंत राऊळ, श्री महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय परुळे आणि काळसे पंचक्रोशी दिव्यांग सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा