You are currently viewing रिमझिम पावसात आपण दोघी

रिमझिम पावसात आपण दोघी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रिमझिम पावसात आपण दोघी*

 

*************

*रिमझिम पावसात*

*आपण दोघे न्हाऊ*

*चिंबचिंब भिजताना*

*आभाळ कवेत घेऊ*

 

सळसळ वाऱ्या संगे

धावत आपण जाऊ

छेडणाऱ्या वादळाला

हाकलून लाऊ

 

*उंच उंच डोंगरावरून*

*झरे झिरणे वाहतील*

*तुझ्या माझ्या अवतीभवती*

*फुलपाखरे खेळतील*

 

खेळणाऱ्या पाखरा संगे

दुर दुर जाऊ

हिरव्या हिरव्या रानातला

रानमेवा खाऊ

 

ओल्या ओल्या मातीतले

दव टिपत जाऊ

लाडावलेल्या कळ्यांना

उमलतांना पाहू

 

*तुला मला पाहून*

*मैना गाणे गातं जाईल*

*गाण्याच्या सुरामध्ये*

*पाणी वहात राहील*

 

वाहणारे पाणी आपण

अंगावर घेऊ

झुळझुळ मंजूळ

आवाज ऐकत राहू

 

माळरानात मोर

नाचताना पाहू

रूप त्याचे देखणे

डोळ्यात भरून घेऊ

 

*पानफुले हिरवी झाडे*

*शृंगारून जातील*

*लतावेली अंगाभोवती*

*पिंगा घालतील*

 

लतावेलींना धरून

झोका घेत जाहू

निळ्याशार आभाळाला

मिठीत आपण घेऊ

 

गर्द धुक्यातून

वाट काढत जाऊ

मऊ मऊ हिरवळीवर

मकईभुट्टा खाऊ

 

*दऱ्याखोऱ्यातून शहारे*

*बेभान होतील*

*डोंगराच्या पायथ्याशी*

*सप्तरंग उतरून येतील*

 

सप्तरंगी रंगाना

लपेटून घेऊ

सैरभैर पाखरासंगे

हरवून जाऊ

 

रिमझिम पावसात

चिंबचिंब होऊ

रंग बदलणाऱ्या ढगांना

खिडकीतून पाहू

 

*संजय धनगव्हाळ*

९४२२८९२६१८

 

*संवाद मिडिया*

 

*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*

 

*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी*

 

*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*

*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*

 

*रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स. 8 ते स. 11.00 वा.*

 

*खालील रक्त तपासण्या केल्या जातील*

 

*डायबेटिस* *(Diabetes Profile)HbA1C*

 

*कोलेस्ट्रॉल (Lipid Profile)*

 

*किडनी(Kidney Function Test)*

 

*लिव्हर (Liver Function Test)*

 

*थायरॉईड (Thyroid Stimulating Hormone) ( TSH)*

 

*स्ट्रेस टेस्ट तपासणी*

 

*स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. आणि* *तुमच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते*

 

*टिप- उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आवश्यक*

 

*नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या खालील शाखेशी संपर्क साधा*

 

*कणकवली – 9373183888*

 

*कुडाळ – 9011328581*

 

*सावंतवाडी – 7774028185*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा