सावंतवाडी :
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथे मोठ्या जल्लोषात साजरा झाला. भाजपचे कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा वाढदिवस अभिष्टचिंतन केले.
संजू परब हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस मी कधीही चुकवत नाही. गेल्या अनेक वर्षांचं असलेलं आमचं हे नातं आम्ही दोन्ही बाजूने टिकवलं आहे. अनेक उन्हाळे पावसाळे आले मात्र माणूस म्हणून संजू कधीही बदलला नाही. पद येतात जातात पण जोडलेली नाती व संबंध कायम राहतात. संजूचा हाच गुण वाखाणण्याजोगा असून त्याला नाती जपता येतात. राजकारणात ज्याला नाती व संबंध जपता येतात तोच राजकारणात यशस्वी होतो. मात्र, ज्याला लोकांची मन कळली तो लोकांच्या ‘मनातील नेता’ होतो. त्यामुळे संजू तू नेहमी मनातला माणूस राहिलास मनातला माणूसच रहा, अशा शब्दांत भाजपचे कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी संजू परब यांना शुभेच्छा दिल्या.
राणे म्हणाले, संजू तू माझ्या भावासारखा आहेस आणि तू माझ्या घरातला आहेस. राणे कुटुंबाच प्रेम तुझ्या नेहमीच पाठीशी आहे. तुझ्या बऱ्या वाईट प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत राहिलो आहे. तू देवाला मानणारा माणूस आहेस. त्यामुळे यापुढेही जमिनीवर राहून काम कर. पक्ष देईल ती जबाबदारी समजून प्रामाणिकपणे काम करीत रहा. काम असं कर की पद स्वतःहून तुझ्याकडे येतील. भविष्यात तुझ्या स्वप्नात व मनात असलेली सर्व पदे तुला मिळोत, अशा शब्दात त्यांनी संजूला शुभेच्छा दिल्या.
संजूचा स्वभाव हा शांत व मनमिळाऊ आहे. त्यामुळे तो नेहमीच सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याच्यासोबत राहून त्याच्या सहवासामुळे आमचा स्वभावही आता संजू सारखा व्हायला लागला आहे. दोन वेळा पराभूत झाल्यानंतरही मी सक्रिय राहिलो. दोन वेळा निवडणुकीत तीन तीन लाख मतं घेतली. अपक्ष असतानाही जनतेने मला भरभरून मते दिली. मात्र, पराभवाने मी खचून गेलो नाही. गेली ९ वर्षे सभागृहाबाहेर आहे. मात्र, कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. आता माझा ‘अर्जुन ‘ झाला आहे. मला फक्त माशाचा डोळा दिसत आहे, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दीपक नारकर, दादा साईल, मकरंद तोरस्कर, जावेद खतीब, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, शेखर गावकर, पंकज पेडणेकर, शर्वाणी गांवकर, रेश्मा सावंत, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, चंद्रकांत जाधव, पुखराज पुरोहित, सुनिल राऊळ, प्रितेश राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर, विनोद सावंत, प्रमोद गावडे, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, अमित परब, हनुमंत पेडणेकर, प्रवीण देसाई, मधु देसाई, संजय नाईक, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, तात्या वेगुर्लेकर, पांडु सावंत, उदय चिंदरकर, बाळू गावडे, दाजी सातार्डेकर, हेमंत मराठे, दत्ताराम खेडेकर, उदय धुरी, उदय देऊलकर, अजित कवठणकर, अष्टविनायक धाऊसकर, विनेश गवस, शाम सावंत, उमेश शिरोडकर, सुरेश गावडे, आफताब हेरेकर, सत्यवान बांदेकर, सोमनाथ परब, ज्ञानेश परब, नारायण परब, लाडू परब, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आदि उपस्थित होते.