(कुडाळ तालुक्यातील वीज ग्राहकांना गणेश चतुर्थीला अखंडीत वीज पुरवठा, संघटन बांधणी व वीज वितरण आधीकाऱ्यांशी चर्चा हे बैठकीचे महत्वाचे मुद्दे)
कुडाळ :
जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्यां सोडविण्यासाठी महाराष्ट्र विज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघ या संस्थांना संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना जिल्ह्यात कार्यरत आहे.
पावसाळा सुरू झाल्या पासुन विज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहेत. काही भागातील नागरिकांना आठ-आठ दिवस वीजेवीना काळोखात घालवावे लागत आहे. विज ग्राहकांना वीजवितरण कंपनीच्या दर्जाहीन सेवेचा नाहक ञास होत असताना विज दरात मात्र भरमसाठ वाढ केली जात आहे. या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेट देऊन लोकांचे प्रश्न समजून घेत आहे व प्रत्येक तालुक्यात ग्राहकांची संघटना स्थापन करीत आहे. या अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील विजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढिल रूप रेषा ठरविण्यासाठी व कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची कुडाळ तालुका बैठक मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 3 वाजता अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत गणेश चतुर्थीच्या काळात वीज खंडित होऊ नये व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा याबाबत वीज वितरणला निवेदन देण्यात येणार आहे तसेकंग महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील वीजे संदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुका कार्यकारिणी गठीत करणे, तालुक्यातील विविध भागातील विज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस भुमिका घेण्यात येणार आहे तसेच बैठकीच्या उत्तरार्धात वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विज समस्यां सोडविणे व विज ग्राहकांना न्याय देणे हा या संघटनेचा हेतू असल्याने विजे बाबत तक्रार असलेले नागरिक, संघटनेचे पदाधिकारी तसेच विज ग्राहक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारीणीत काम करु इच्छिणाऱ्या कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे. असे अवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांनी केले आहे.