You are currently viewing ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेर निवड

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेर निवड

*ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश युवा अध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेर निवड*

*प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी दिले निवडीचे पत्र*

*कोकण प्रदेश-* ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे क्रियाशील पदाधिकारी श्री नवलराज विजयसिंह काळे यांची महासंघाच्या कोकण प्रदेश युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सन 2015 सालापासून आदरणीय प्रवीण काकडे साहेब यांच्यासोबत महासंघाचे कार्य कोकण किनारपट्टी वरती वाढवण्याचं काम काळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं वेळोवेळी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा समाजसेवेचा नियोजनबद्ध कार्यक्रमांचा त्यांना योग्य जबाबदारी देऊन आदरणीय प्रवीण काकडे यांनी वेळोवेळी सन्मान केला 1 एक वर्ष सदस्य,1 वर्ष वैभववाडी तालुका अध्यक्ष 3 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तर 3 वर्ष कोकण युवक अध्यक्षपदी आणि आज पुन्हा त्यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. काळे यांच्या निवडीमुळे कोकणातील युवकांना संघटित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होईल,तरुण तडफदार कार्यशील नेतृत्व गुण असणाऱ्या नवलराज काळे यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्षपदी निवड करून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोकणातील धनगर समाजाच्या प्रश्नांवर नेहमीच प्रवीण काकडे यांनी आवाज उठवला कोकणातील धनगर समाज शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी महासंघातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी अनेक पदाधिकारी महासंघाला जोडले गेले. कोरोना काळात शैक्षणिक साहित्य वाटप ,होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, विद्यार्थी दत्तक घेणे अशा प्रकारचे अनेक उपक्रम प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात राबविण्यात आले. कोकणातील धनगर वस्त्यांच्या रस्त्यांचे प्रश्न,पाणी प्रश्न व इतर अडचणींवर वारंवार नवलराज काळे प्रशासनाशी संवाद साधत होते. वेळ पडली तर लोकशाही मार्गाचा अवलंब ही करत असत,प्रसार माध्यमांच्या मदतीने विद्यमान सरकार प्रशासन यांना जाग आणण्याकरिता ते कार्य तत्पर असत त्यांच्या या कार्याचा आढावा महासंघाने दिल्लीपर्यंत घेतला आहे. म्हणूनच त्यांचीही तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃‍♂️🏃‍♀️

*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*

*डॉ. आठवले कॅम्पस*

🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸

*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*

*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री

*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री

*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣

*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स

*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*

*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*

*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*

*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा