You are currently viewing आयुष्याच्या वळणावरती

आयुष्याच्या वळणावरती

*लालित्य नक्षत्रवेल, आम्ही बालकवी, काव्य निनाद साहित्य मंच पुणे आदी समूहाच्या सदस्या कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्याच्या वळणावरती*

 

आयुष्याच्या वाटेत वळणे येती खरी

कधी उंचवटा अन् कधी ती खोल दरी

 

आयुष्याच्या सागरी खेळू लाटांवरती

असे कधी ओहोटी तशीच येई भरती

 

आयुष्याच्या पणती मध्ये प्रकाश वाती

निळ्याशार आभाळी चंद्रासम भासती

 

आयुष्याच्या प्रवासी धाव यशाच्या मागे

निराशेने फिरतो विणत ध्येयाचे धागे

 

आयुष्याच्या स्वप्नात सुखाची कळी खुले

हसताना हिरव्या काट्यावर ती कशी फुले

 

आयुष्याच्या वास्तवी अनुभवांची वीण

गुंतता भावनामध्ये जाई मनाचा क्षीण

 

आयुष्याच्या पुस्तकी रंगीत चित्रे छान

अक्षरांनी सजले सुखदुःखाचे पान

 

आयुष्याच्या संध्येत क्षितिज रंगलेले

थकल्या पाय वाटा काट्याने भंगलेले

 

 सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर

 शिरोडा, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा