You are currently viewing १९ ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष संजू परब वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

१९ ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष संजू परब वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

सावंतवाडी :

 

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहीत यांच्या माध्यमातून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या शनिवार १९ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रामेश्वर प्लाझा येथील ‘टायटन ऑप्टीकल हब ‘ येथे होणार आहे. यावेळी तपासणी करणार्‍या रुग्णांना कमीत कमी दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बंटी पुरोहीत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा