*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*जावे तर लागतेच ना?*
जन्म व मृत्यू दोन्ही आपल्या हातात नाहीत व कोण केव्हा
कुठे कसा एक्झिट घेईल ते ही सांगता येत नाही.म्हणजे
श्वास घेतल्या पासून श्वास सोडे पर्यंतचा मधला काळ
म्हणजे आपले जीवन ! परवाच एका बातमीने मला जोरदार
झटका दिला ते मी घायवटां विषयी तुमच्याशी बोललेच.
म्हणजे आपल्या हाती आलेला हा काळ अत्यंत अनिश्चित
आहे. मी ह्या वयात असे करीन व त्या वयात असे करीन..
सब..झूट
अहो, तुम्ही किती जगणार आहात हेच तुम्हाला माहित नाही.
व जे ठरले आहे ते घडल्या शिवाय रहात नाही.
अभिमन्यू पुत्र परिक्षित राजा (उत्तम राजा)शिकारीला गेला
असता तहानेने व्याकूळ होऊन ध्यानस्थ शमिक ऋषींकडे
त्याने पाण्याची मागणी केली. पण मुनींना ध्यानावस्थेत ते
कळले नाही व राजावर” कली” चा प्रभाव असल्यामुळे राजाने
चिडून मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकला.तो त्यांचा मुलगा
ऋंगी ऋषीने पाहिला व चिडून आज पासून सातव्या दिवशी सर्पदंशाने
तुझा मृत्यू होईल असा त्याने परिक्षिताला शाप दिला. मग राजा साठी काचेचा महाल
बनवून कडेकोट बंदोबस्तात तो राहू लागला. कुणाचाही शिरकाव होणार नाही याची काळजी घेतली गेली कारण
परिक्षित उत्तम शासक होता.
पण विधी लिखीत कुणालाही चुकत नाही.बोरातली अळी बनून
तक्षकाने महालात प्रवेश करून तो परिक्षितला डसला.
पुढे मग जनमेजयाने सर्पयज्ञ केला.म्हणजे पहा जे थोरामोठ्यांना चुकले नाही ते आपल्याला काय चुकणार?
.थोडक्यात काय ? जावे तर लागतेच ना ?
.मग, काय करायचे?
तर… कीर्ति रूपी उरायचे.. खरे ना? ते तर पूर्णच आपल्या
हातात आहे ना? जो पर्यंत आपल्याला समज नसते तोवर
ठीक आहे पण जेव्हा पासून आपल्याला कळायला लागते,
आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागतो तेव्हा तरी आपण
आपल्या आयुष्याला एक निश्चित दिशा द्यायला हवीच ना?
टिळकांच्या वडिलांनी टिळकांच्या नावावर पैसे ठेवले व म्हणाले, आता शिका पाहिजे तेवढे! टिळक शिकत होतेच
पण वर्तमान पत्र काढून इंग्रजांच्या मागे हात धुवून लागले.
बायको घरी होती बिचारी तिच संसार ओढत होती. टिळळ
फक्त पैसे द्यायचे. घराकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता इतकं देशप्रेम
नसानसातून वहात होतं. देश प्रेमाचं काही ट्रेनिंग घेतलं होतं काय त्यांनी? लॅा करत असतांना वाटलं तब्बेत
कमवायची की लगेच व्यायामशाळा जॅाईन
केली व एक वर्षात तब्बेत कमावली व पुन्हा कामाला लागले.
याला म्हणतात विचार व आचरण सुसंगत असणे.गणित व
संस्कृतात टिळक अव्वल होते पण ब्रिटिश मास्तर त्यांना एम ए ला गणितात पास करेचना! शेवटी दिला नाद सोडून. म्हणून काय
ते हुशार नव्हते काय?गीता रहस्यासह सहा ग्रंथ त्यांच्या
बुद्धिमत्तेची प्रचंड झेप दाखवतातच ना? टिळकांच्या भाषणांचा
ब्रिटिश सरकारने प्रचंड धसका घेतला होता,टिळकांना ते
चळाचळा कापत असत, एवढा टिळकांचा दरारा होता.असे
हे आपले टिळक गेले म्हणता ? अजिबात नाही. पावलोपावली
ते आपल्या बरोबर आहेत.
म्हणतात ना, नरदेहाचं सार्थक कसं करायचं हे आपल्या हातात
आहे. कारण देवाने आपल्याला प्रचंड बुद्धिमत्ता दिली आहे.
स्वामी विवेकानंद.. घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती,
दोन दोन दिवस उपवास घडत असत. गुरू रामकृष्ण परमहंस
म्हणत, अरे, बैस “काली” पुढे, माग ना काहीतरी. पण काली पुढे
बसताच विवेकानंदांचे भान हरपे. मागणे तर दूरच. परमहंस
विचारत, मागितलेस का काही? नाही हो गुरूदेव, माते पुढे
समोर बसताच मी स्वत:च हरवून जातो, काय सांगू तुम्हाला!
अशा फाटक्या अवस्थेत पुरेसे गरम काय साधे ही कपडे
नसतांना हा माणूस अमेरिकेत जातो व कडाक्याच्या बर्फाळ
थंडीशी लढत शेकडो व्याख्यानातून जगाला खऱ्या भारतीय
संस्कृतीची ओळख करून देतो, याला म्हणतात…
.”तेथे पाहिजे जातीचे” येरा गबाळ्याचे काम नव्हे”.
भारताची पायाभरणी करणारे सारे नेते असेच होते मग
ते जे आर डी टाटा असोत वा सरदार वल्लभभाई पटेल
असोत. त्या शिवाय का त्यांनी साम दाम दंड भेद नीतिचा
अवलंब करून ब्रिटिशांनी खालसा केलेली व स्वतंत्र भारताशी
फटकून वागणारी राज्ये, निजाम व गोव्यासह भारतात एकत्र आणून
विशाल भारताची निर्मिती केली. किती द्रष्टे होते नव्हे , द्रष्टे
तर होतेच हे लोक पण त्यांची मायभूमी पोटी असलेली निष्ठा
त्यांच्याकडून कठोरपणे ही कामे करवून घेत होती नाही तर..
भारताची अजून किती शकले झाली असती याची कल्पनाच
न केलेली बरी. त्या अर्थाने ह्या मंडळींचे भारतावर प्रचंड
उपकार आहेत व त्यात त्यांचा स्वत:चा काडीचाही स्वार्थ
नव्हता , नाही तर आम्ही? स्वार्था शिवाय एक ही काम करण्याचा विचारही करू शकत नाही.
खरंच, मायभूमी मानतो का हो आम्ही? तिकडे जपान मध्ये
ट्रेन मध्ये प्रवास करत असतांना बसायच्या एका बर्थचे कापड
फाटून कापूस दिसू लागताच एक प्रवासी स्री सुई दोरा काढून
लगेच ते सीट शिवते, काय म्हणावे या देश प्रेमाला?
आम्ही तर तो कापूस ओढून काढत आपल्या पिशवित कोंबून
केव्हाच लंपास केला असता. आपण फक्त लुटारू आहोत लुटारू? लुटण्याची एक ही संधी आम्ही सोडत नाही. जपान
मध्ये काम कमी करा असे लोकांना सांगावे लागते. आम्ही?
मला तर तुलनेनेही हसू येते. पगारा पुरते ही काम आम्ही करत
नाही हो ! नि त्याची आम्हाला ना लाज आहे ना शरम !
जावे तर लागतेच हे माहित असून, जातांना येथेच सारे
सोडून जावे लागते हे माहित असून, पुढच्या चार पिढ्यांची
सोयही झाली आहे हे ही माहित असून आता तरी गावा साठी,
समाजा साठी, देशा साठी काही करावे अशी आम्हाला बुद्धी
होत नाही मग “ बैलदाराचा हेला नि पाणी वाहून मेला”
अशी आमची अवस्था झाली नाही तर नवलच !
अहो, लांब जाऊ नका, गल्लीतल्या गरीबांची शिकवणी
करा, मोफत, डॅा.असाल तर दोन तास गरिबांची मोफत
तपासणी करा.वृद्धांना मदत करा. किती तरी मार्ग आहेत
सेवाधर्माचे, शोधले तर सापडतातच! पण आम्हाला शोधायचेच नसतील तर कसे सापडणार? सेवा केल्याने,
मदत केल्याने जी आत्मशांती मिळते तिचा एकदा तरी
अनुभव घेऊन पहा म्हणजे कळेल की सेवाभाव माणसाला
किती सुखी बनवतो.
मंडळी, मृत्यूची भीती बाळगू नका. त्याची वाट ही पाहू नका.
जे मोजून श्वास देवाने आपल्याला दिले आहेत , हो( एक ही
कमी नि एक ही जास्त होत नाही) ते कसे आपल्याला चिरंजीव
बनवतील याचा विचार करा. अहो, “पृथ्वीराज चव्हाण”पासून
बाबू गेनू पर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणारा एकही
लहान मोठा माणूस मेला नाही हो? आपल्या रक्ताच्या
थेंबा थेंबात ते अजरामर आहेत, चिरंजीव आहेत, आणि..
“आचंद्रसूर्य ते अजरामर रहाणार आहेत मग मृत्यूची भीती
कशाला? या भंगूर देहाची लालसा कशाला? तो जळाला तरी
काही तरी कारणाने निमित्ताने आपण जिवंत राहिले पाहिजे व
आपल्या पिढ्यांनी अभिमानाने इतरांना सांगायला हवे,
ह्यांनी असे असे काम केले?
“मरावे परी कीर्तिरूपी उरावे “
निदान आपला गाव घर समाज आपल्याला विसरणार
नाही एवढे तर नक्कीच करू शकतो आपण? हो ना?
आपल्याला सूर्य होता येणार नाही, मान्य आहे पण पणती
बनून तरी आपण कुणाच्या प्रकाशाची वाट बनवायला काय
हरकत आहे?
चला तर मग.. शुभस्य शिघ्रंम् ..
All the best
खूप खूप धन्यवाद…
आणि हो, नेहमी प्रमाणे ही फक्त माझी मते आहेत…
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
दि : १७ ॲागष्ट २०२३
वेळ : सकाळी ९/३४
*संवाद मिडिया*
*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*
*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी*
*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*
*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*
*रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स. 8 ते स. 11.00 वा.*
*खालील रक्त तपासण्या केल्या जातील*
*डायबेटिस* *(Diabetes Profile)HbA1C*
*कोलेस्ट्रॉल (Lipid Profile)*
*किडनी(Kidney Function Test)*
*लिव्हर (Liver Function Test)*
*थायरॉईड (Thyroid Stimulating Hormone) ( TSH)*
*स्ट्रेस टेस्ट तपासणी*
*स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. आणि* *तुमच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते*
*टिप- उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आवश्यक*
*नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या खालील शाखेशी संपर्क साधा*
*कणकवली – 9373183888*
*कुडाळ – 9011328581*
*सावंतवाडी – 7774028185*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*