भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक जण भाजपमध्ये
कुडाळ
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या सर्व प्रवेश करणाऱ्यांची कामे भाजप पूर्ण करेल, अशी खात्री त्यांना वाटत असल्यानेच सर्व पक्षातील विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. हे सर्वजण ज्या उद्देशाने भाजपमध्ये दाखल होत आहेत त्यांना आपण खात्री देतो की, त्यांची ग्रामपंचायतमधील रखडलेली विकासकामे भाजप पूर्ण करेल. भाजप त्यांच्या समवेत कुटुंबासारखा उभा राहील, असा विश्वास भाजप नेते निलेश राणे यांनी आज कुडाळ येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवानेते विशाल परब, संध्या तेरसे, प्राजक्ता शिरवलकर, निलेश परब, राकेश कांदे, विलास कुडाळकर आदी उपस्थित होते.
गावराई, पडवे, वेताळ बांबर्डे येथील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
कुडाळ येथील भाजप कार्यालयात आज गावराई, पडवे आणि वेताळ बांबर्डे येथील नागरिकांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. गावराई सरपंच सोनाली तिरोडकर (उबाठा गट), पोलीस पाटील स्वप्निल वेंगुर्लेकर, पडवे ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम
(उबाठा गट), ग्राम. सदस्य विजयालक्ष्मी परब, ग्राम. सदस्य संगीता नलावडे, धनेश तिरोडकर, प्रतिभा गावडे तसेच वेताळ बांबर्डे येथील उभाठाचे पदाधिकारी विशाल सांडव, रोशन सांडव यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सिंधुदुर्गचा राजा मंडप उभारणीचा दिमाखात शुभारंभ
कुडाळ भाजपा कार्यालयासमोरील पटांगणात सालाबादप्रमाणे स्थापन होणाऱ्या सिंधुदुर्गचा राजा मंडप उभारणी शुभारंभ आज भाजपा नेते, निलेश राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना निलेश राणे म्हणाले की, यंदा गोपाळकाला आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून ‘सिंधुदुर्गचा राजा ‘ मानाने विराजमान होईल. तसेच येत्या ८ सप्टेंबर २०२३ रोजी कुडाळ एसटी मैदानावर दहीहंडी उत्सव होणार असून यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
कुडाळ येथे ८ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव
यावेळी पत्रकार परिषदेत भाजप नेते निलेश राणे म्हणाले की, मागील दोन ते तीन वर्षे कोरोनाच्या कालावधीत दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यावर्षी दहीहंडी उत्सव कुडाळ येथे ८ सप्टेंबर २०२३ रोजी कुडाळ एसटी ग्राउंड येथे मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येईल. या दहीहंडी उत्सवात पहिले बक्षीस ५ लाख ५५ हजार ५५५ असेल. या दहीहंडी उत्सवात दिग्गज मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल. अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेता भाऊ कदम, अभिनेता देवदत्त नागे तसेच अन्य प्रसिद्ध गायक आणि कलाकार या दहीहंडी उत्सवात कुडाळमध्ये दाखल होणार आहेत.
विश्वकर्मा योजनेचा कोकणातील पारंपारिक कारागिरांना फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेचा पहिला टप्पा जाहीर केला असून यामुळे कोकणातील पारंपरिक कारागिरांना याचा फायदा होईल, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला तब्बल १३ हजार कोटी ५ वर्षात कारागिरांसाठी योजनेतून प्राप्त होणार आहेत. कोकणात पारंपारिक कारागीर अधिक असून याचा फायदा त्यांनी घ्यावा. या संदर्भात संपूर्ण माहिती कारागीरापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे निलेश राणे म्हणाले. प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी भाजपने विडा उचलला असल्याचेही निलेश राणे यावेळी म्हणाले.
शिंदे -फडणवीस सरकारचे निलेश राणे यांनी व्यक्त केले आभार
कोकणातील गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून कोकणात येणाऱ्या चाकरमानी वर्गासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एसटीच्या ३१०० बसेस धावणार असल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आपण आभारी असल्याचे निलेश राणे म्हणाले.
गणपतीपूर्वी मुंबई – गोवा महामार्गावर एक लेन सुरू होणार
गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचे भाजप नेते निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होईल.
शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडेच आहे!
शिवसेनाही मुख्यमंत्री शिंदेंकडेच आहे. उभाठा हा केवळ एक गट असून त्याची दखल घेण्यासारखे काहीही राहिलेले नाही. स्थानिक आमदार वैभव नाईक यांचे केवळ उपद्रव मूल्य शिल्लक आहे, अशी टीका सुद्धा निलेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत केली. पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जे आमच्या पक्षात येत आहेत त्या नागरिकांचे स्वागत आहे असेही निलेश राणे म्हणाले.
तर कोकण रेल्वेत होणाऱ्या तिकिटांच्या काळाबाजाराबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता निलेश राणे म्हणाले की, याबाबत पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एजंटवर लक्ष देणे गरजेचे असून हे माफियांसारखेच आहेत. याबाबत यापूर्वी स्वतः आपण व्हिडिओही करून नागरिकांपर्यंत तो पोहोचविला होता, असे भाजप नेते निलेश राणे म्हणाले.
*संवाद मिडिया*
*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃♀️🏃♂️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*
*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*
*👗किया फॅशन👘*
*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*
*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*
*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*
*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*
*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*
*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*
*📲संपर्क:-*
*9403920802*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*