गणेश उत्सव म्हटला.. की सर्वात पहिली आठवण येते ती कोकण ची…
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला कोकणात मोठे स्थान आहे..
वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात… पटेलवाडी येथील दळवी पटेल कुटुंबीयांचा गणेश उत्सव… हे येथील खास आकर्षण आहे…
गेली कित्येक पिढ्या या कुटुंबाने कौटुंबिक सार्वजनिक गणेश उत्सवाचे मोठे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे… संबंधित 11 कुटुंबांचा येथे मानाचा एकच गणपती असतो.
या व्यतिरिक्त संबधीत वाडीतील सर्व कुटुंबांची गौरी देवी ही येथेच स्थापन केली जाते….11 दिवस चालणारा हा गणेश उत्सव कुटुंबातील किमान 130 व्यक्ती मिळून मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात..