You are currently viewing मालवण शहर झाले कोरोनामुक्त…..

मालवण शहर झाले कोरोनामुक्त…..

लॉकडावूनच्या सुरुवातीच्या कालावधीपासून अथक मेहनत घेणार्‍या मालवण न.प.मुख्याधिकार्‍यांचे मालवण तालुका मनसेच्या वतीने “कोव्हिड योद्धा”म्हणुन केला सत्कार.

मालवण
कोव्हिड वैश्विक महामारीच्या काळात आव्हानात्मक कालावधीतधीत कोव्हिड-१९ चे संक्रमण थांबववण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करत शहरातील व शहरात येणार्‍या नागरिकांना शिस्त लावणार्‍या प्रसंगी कठोर कारवाई करणार्‍या न.प.मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचा कोव्हिड योद्धा म्हणून मालवण तालुका मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात केला.यावेळी जावडेकर यांनी हे यश फक्त माझे नसून न.प.कर्मचारी, अधिकारी यांनी घेतलेल्या जीवतोड मेहनतीचे हे यश आहे.म्हणुनच मी सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने हा सत्कार स्वीकारत असल्याचे संगितले.तसेच अजून धोका टाळलेला नसून सर्वांनीच योग्य खबरदारी घ्यावी व न.प. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, सचिव विल्सन गिरकर, गुरु तोडणकर, प्रतीक कुबल, संकेत वाईरकर, गौरव गांवकर, हरी खवणेकर, साईराज चव्हाण, अमेय सुर्वे, विवेक गाडगीळ, हितेंद्र काळसेकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना या संकटाचा सामना करण्यासाठी मालवणमध्ये डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलीस, महसुल यंत्रणा, सफाई कामगार, पत्रकार हे करत असलेले कार्य निश्चितच गौरवशाली होते. याच गौरवात भर टाकण्याचे काम न.प.मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले.न.प.चा अपुरा कर्मचारी वर्ग असताना समन्वय साधत शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत नागरिकांना शिस्त लावण्याचे काम केले होते. आपल्या कार्यात सातत्य ठेवल्यानेच आज तब्बल पाच महिन्यांनी मालवण शहर कोरोना मुक्त झाले.
सुरुवातीच्या काळात मालवण शहरात कोव्हिड रुग्ण संख्या शून्यावर होती.आताही बाहेरून येणार्‍या व मास्क न वापरणार्‍या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई होत आहे.म्हणुनच नागरिकांच्या आरोग्यासाठी लढणार्‍या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचा सत्कार आम्ही मनसेच्या वतीने केला.असे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी यावेळी बोलताना संगितले.
सोशल माध्यमांमध्ये मालवण कुडाळ चे आमदार वैभव नाईक हे मालवण नगरपालिका प्रशासनाला मालवणात येणाऱ्या पर्यटकांवर जर ते विनामास्क फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका पण मालवणातील नागरिकांवर,लोकप्रतिनिधींवर कारवाई करा अशा प्रकारचे सूचना देत असल्याचा मेसेज फिरत आहे.

नियम सर्वसामान्य जनतेला एकच असेल आणि विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर आपण कारवाई करणार नसाल तर अशा कारवाईतून मालवण शहराबरोबरच मालवण तालुक्यातील अन्य गावातुन शहरात येणाऱ्या नागरिकांवर तसेच लोकप्रतिनीधींवर देखील अशाप्रकारे आपण कारवाई करू नये.अशाप्रकारचे निवेदन मनसेच्यावतीने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे देण्यात आल्याचे मनसेतर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा