You are currently viewing “माझा कोकणातील भूमिपुत्र हा प्रशासकीय सेवेत आलाच पाहिजे व येणारच”- सत्यवान यशवंत रेडकर

“माझा कोकणातील भूमिपुत्र हा प्रशासकीय सेवेत आलाच पाहिजे व येणारच”- सत्यवान यशवंत रेडकर

*”माझा कोकणातील भूमिपुत्र हा प्रशासकीय सेवेत आलाच पाहिजे व येणारच”- सत्यवान यशवंत रेडकर*

सिंधूपुत्र स्वरूपात स्पर्धा परीक्षां बाबत शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षां बाबत जनजागृती तसेच समाज प्रबोधन करण्याचे कार्य सावंतवाडी तालुक्यातील कवठणी (बोरभाटवाडी) या गावचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत मा. सत्यवान यशवंत रेडकर अविरतपणे करीत आहेत.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश पचवून उभे राहायला शिका. शासकीय नोकरीतही खूप पर्याय असून, त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. व्यसन असल्यास ते आजच सोडा आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करा. ”शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याचा विचार करा, असे प्रतिपादन ”तिमिरातूनी तेजाकडे” या संस्थेचे सत्यवान रेडकर यांनी सुकळवाड येथे केले.‘शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव’ ही स्वप्नातील संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी, कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, गट ‘अ’ ते गट ‘ड’ प्रवर्गातील पदावर रुजू होऊन शासकीय नोकरीचा प्रारंभ करावा, कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य दिसावे, ही अभिनव संकल्पना ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या संस्थेमार्फत या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र रेडकर यांनी एमआयटीएम इंजिनियरिंग कॉलेज, सुकळवाड येथे शासकीय स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केले. सर्वात जास्त डिग्री संपादन करणाऱ्या काही महाराष्टातील प्रमुख नामांकित व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी विविध पदव्या संपादन केल्या आहेत. मनुष्य हा कायम विद्यार्थी असतो या भावनेशी प्रेरित होऊन अजूनही त्यांचा शिक्षण प्रवास सुरू आहे. शासकीय नोकरीत कार्यरत असूनही त्यांनी उभारलेली स्पर्धा परीक्षा जागृतीची चळवळ अबाधित सुरू आहे. कोकणातील माझा एक जरी भूमिपुत्र शासकीय चळवळीत सामील झाला, तरी मला आनंद आहे, असे श्री. रेडकर यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत २०० हुन अधिक व्याख्यानांद्वारे त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत. अशा प्रकारे मार्गदर्शन रेडकर यांनी जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना केले. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञानाचे भांडार पोचावे आणि विद्यार्थी सक्षम व्हावेत, त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे, यासाठी एमआयटीएमचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी या व्याख्यान आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य हे उज्ज्वलच असले पाहिजे, असे मत प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर उपप्राचार्य पूनम कदम, उपप्राचार्य विशाल कुशे उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा