You are currently viewing वेंगुर्ले येथे वीज ग्राहक संघटनेची १८ ऑगस्ट रोजी बैठक

वेंगुर्ले येथे वीज ग्राहक संघटनेची १८ ऑगस्ट रोजी बैठक

वेंगुर्ले येथे वीज ग्राहक संघटनेची १८ ऑगस्ट रोजी बैठक

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गच्या मान्यतेने वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना, वेंगुर्लाची तातडीची बैठक १८ऑगस्ट रोजी ४ते ६ यावेळेत नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत MSEB कंपनीचे उप कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता,कुडाळ उपस्थित राहून ग्राहकांच्या अडी अडचणी, समस्या तसेच सूचना समजून घेणार आहेत.
याशिवाय देखभाल, दुरुस्तीचे कंत्राटदार सुध्धा हजर राहणार असून मीटर रीडिंग घेणारे व बिल वाटप करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत थेट चर्चा करण्याची संधी महावितरण कंपनीने सर्व ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. वायंगणी ते चीपी भाग वगळता वेंगुर्ला तालुक्यातील इतर सर्व ग्रामपंचायत मधील तसेच शहरातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे.
वेंगुर्ला MSEB ऑफिसला जोडले गेलेले सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, तिरोडा, नानोस, मळेवाड, आरोंदा, किनळे, गुळदुवे, कवठणी, साटेली, सातार्डा या सर्व गावातील वीज ग्राहकांनी सुध्धा याचं मीटिंगला हजर राहून आपल्या समस्या मांडणे आवश्यक आहे. तरी शुक्रवारी होणाऱ्या सभेत गणेश चतुर्थी पूर्वी संभाव्य समस्या सोडविण्यासाठी वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना कटिबध्द आहे म्हणून जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी लिखित स्वरूपात आपल्या तक्रारी सोबत घेऊन याव्यात असे आवाहन श्री. संजय गावडे, अध्यक्ष – वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना, वेंगुर्ला व ॲड. श्री. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा समन्वयक – सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा