वेंगुर्ले :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असताना वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रा.पं. च्या स्थापनेलाही ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने व स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत स्वच्छतेच्या बाबतीत नाविन्यपूर्ण उपक्रमांनी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परुळेबाजार ग्रामपंचायत राज्यस्तर, विभाग स्तरावर मानांकन मिळवत आहेच परंतु स्वच्छतेच्या विषयातील नाविन्य पूर्ण उपक्रम पाहता केंद्रीय पातळीवर सुध्दा ही ग्रामपंचायत नक्कीच मानांकन मिळवेल यात शंका नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी) विनायक ठाकुर यानी परुळे येथे बोलताना केले.
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, उपअभियंता प्रफुल्ल कुमार शिंदे, पाणी पुरवठा कक्षाचे निलेश मठकर, जि. प. माजी सभापती निलेश सामंत, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुदवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, तन्वी दुदवडकर, नमिता परुळेकर, सीमा सावंत, पुनम परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे यांसह ग्रा.पं. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या नविन सांडपाणी प्रक्रिया युनीट पदके, सोलर पॅनल युक्त शाळा, ई. बाईक कचरा संकलन गाडी, सार्वजनीक स्वच्छतागृह, ओला कचरा प्रक्रिया युनीट या उपक्रमांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रा पं. तीच्या ७५ वा वर्षा निमीताने कार्यालयात स्वातंत्र्यदिना निमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन कण्यात आले होते. यानिमीताने लहान मुलांचे नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी माझी माती माझा देश या अंतर्गत शिलाफलक अनावरण स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनीक कुटुंबीयांचा सन्मान, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.