कणकवली
कणकवली तालुक्यातील लोरे नंबर एक येथील सरपंच अजय रावराणे यांनी लोरे नं.१ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१९ / २०२० प्र.जि.मा. ७ गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यामध्ये विद्यमान असलेले कृषीबाजार समितीचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे व त्यांचे पुत्र हे गावाचे विद्यमान सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी या रस्त्यावर अतिक्रमण असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चंद्रशेखर दशरथ रावराणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
चंद्रशेखर दशरथ रावराणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मु.पो.लोरे नं. १ चा रहिवाशी असून लोरे नं.१ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१९ / २०२० प्र.जि.मा. ७ गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यामध्ये विद्यमान असलेले कृषीबाजार समितीचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे व त्यांचे पुत्र हे गावाचे विद्यमान सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे असे पत्र मा.कार्यकारी अभियंता यांस १७/०४/२०२३ व २४/०७/२०२३ पाठवले होते तथापि कार्यकारी अभियंता यांनी गावचे सरपंच यांना पत्रव्यवहार करूनही अद्यापही अतिक्रमण हटवले नाही तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ज ३ अन्वये ग्रामपंचायत सरपंच यांनी शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अश्या व्यक्तीस त्यांच्या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. ग्रामपंचायत अधिनियम कायदा, ग्रामविकास मंत्रालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या अतिक्रमणाबाबत निर्णय निर्गमित केले गेले आहेत. वरील निकषांवरून अतिक्रमण केलेल्या संबधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करून, दोषी
ठरल्यास तत्काळ सदस्य पदावरून कमी करण्यात यावे. असे पत्र देखील त्यांनी ग्रामविकास खात्याकडे दिले आहे वरील निकषांवरून संबधित दोषींवर कऱवाई नाही झाल्यास आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद आपण घ्यावी