*आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा लेखिका सौ.वृंदा कांबळी यांचे मनोगत*
*..जयवंत दळवींच्या सहवासात..*
*✍️सौ. वृंदा कांबळी.*
काल जयवंत दळवींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला साहित्य प्रेरणा कट्टा व दळवी कुटूंबीय यानी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे स्थळ होते जयवंत दळवींचेच घर ( वाडा) .
मी जयवंत दळवींच्या साहित्यनिर्मिती प्रक्रियेवर बोलले. पंधरा वीस मिनिटात जेवढ बोलता येईल तेवढच काही मुद्याना स्पर्श करून बोलले.बोलताना सारख वाटत होत की मी सगळे नाही सांगू शकत. मग दळवी माझे बोलणे ऐकत असतील. ते रागावणार तर नाहीत ना? त्यांच्याच घरात जाऊन त्यांच्याच साहित्यावर बोलण्याचा लहान तोंडी मोठा घास घेतल्याने ते नाराज तर होणार नाहीत ना?
त्या वाड्याच्या अंगणात पाऊल टाकल्यापासून मी मात्र वेगळयाच पातळीवरून विचार करत होते. इथे या अंगणात ते खेळले होते.इथेच पाणंदीत नाडकर्णींच्या वेड्या बहिणीला बघून घाबरून धावत येताना इथूनच घरात शिरले होते. शाळेतून आल्यावर दप्तर घेऊन इथूनच आत जात होते.
माडीकडे लक्ष गेले. अरे! याच माडीवर ते एकांतात पिंपळाकडे बघत विचारमग्न बसलेले असायचे. त्यांची आवडती शिसवी खुर्ची असेल का आता? हाॅलच्या बंद दाराआड त्यांचे भले मोठे माजघर होते. वाटल याच माजघराच्या कोपर्यातून याच वाड्याच्या खोल्यांमधून घरातील तत्कालीन स्त्रियांचे हुंदके कोंडलेले असतील. जे हुंदके, जी स्त्रियांची घुसमट येथील पारंपारिक धार्मिक व्यवस्थेने केलेली होती. सर्वानीच डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली होती. त्या असहाय स्त्रियांचे दबलेले हुंदके फक्त जयवंत नावाच्या माणसाच्या संवेदनशील कानानी टिपलेले होते. माजघरातील घुसमट त्यांच्या संवेदनशील मनाने जाणलेली होती. याच परिसरात त्याना अपंग दत्तू भेटला असेल. याच गावात त्याना बुटका कुरूप लहानपणीचा मित्र भेटला असेल. याच गावात त्यानी ती वेडी पाहिली असेल. जी नेहमीच गरोदर असलेली दिसायची. अशा कितीतरी करूण कहाण्या की ज्या फक्त जयवंत नावाच्या अवलियानेच जाणलेल्या होत्या. त्या परिसरात गेल्यावरशया आणि अशा असंख्य कहाण्यांचे स्मरण झाले. त्या कहाण्यांमधील माणसांच्या मनातील भावनांचे व विचारांचे ताण तणाव , त्यांचे अंतर्गत पीळ साहित्यातून मांडून त्या त्या व्यक्तिरेखाच साहित्यातून अजरामर करणारे जयवंत दळवी समोर दिसत होते. फोटोतून प्रसन्न प्रसन्न मिस्कील हसत होते. मी भक्ती भावनेने देवाला हात जोडावा तितक्यात श्रद्धेने त्यांच्यासमोर नतमस्तक झाले.
.काल वाटत होते की जयवंत दळवी जगात नाहीत? अरे! नाहीत कसे? या वाड्याच्या परिसरातील कणाकणातून त्यांचे भरून राहिलेले अस्तित्व स्मृतींच्यारूपाने जिवंत आहेच. ते गेलेले नाहीत. त्यांच्या अजरामर कलाकृतीतून , त्यांच्या व्यक्तिरेखेतून, त्यांच्या असंख्य स्मृतीतून ते आजही माझ्या मनात जिवंत आहेत. हसत आहेत मिस्कीलपणे. काही सांगू पहाताहेत ते. त्याना काय बर सांगायच असेल. आपण ते समजून घेतल पाहिजे.
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*