कट्टा वराडकर हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम…
मालवण
भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. हा सांगता उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे जवळपास ७६ फूट लांबीचे भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र बालकलाकारांनी साकारले आहे. हे चित्र या प्रशालेतील विद्यार्थिनी फक्त दोन तासांमध्ये पूर्ण केले. जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लांबीचे चित्र प्रथमच साकारलेले आहे.
हे चित्र साकारण्यासाठी प्रशालेतील इयत्ता आठवी ते बारावी तसेच माजी विद्यार्थी व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक व कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.