You are currently viewing सावंतवाडी अर्बन बँक प्रकरणी माजी संचालक अजित नाडकर्णी यांचे आश्वासनाअंती 16 रोजी चे उपोषण स्थगित

सावंतवाडी अर्बन बँक प्रकरणी माजी संचालक अजित नाडकर्णी यांचे आश्वासनाअंती 16 रोजी चे उपोषण स्थगित

सावंतवाडी अर्बन बँक प्रकरणी माजी संचालक अजित नाडकर्णी यांचे आश्वासनाअंती 16 रोजी चे उपोषण स्थगित

फोंडाघाट

सावंतवाडी अर्बन बैंक लिक्विडेशनमध्ये गेल्याने माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी १६ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
परंतु बँकेच्या सीईओनी बँक १२ सप्टेंबरपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होतील अशा आशयाचे पत्र नाडकर्णी यांना दिले आहे. लिक्विडेशन मध्ये गेलेल्या अर्बन बँकेला 45 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी ही 45 दिवसाची मुदत देऊन सहकार्य करण्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यातील एक महिना आधीच पूर्ण झालेला असून चतुर्थी पूर्वी खातेदारांच्या ठेवी त्यांना मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दिलेल्या वेळेत जर ठेवी परत दिल्या गेल्या नाहीत तर 16 सप्टेंबर रोजी माजी संचालक अजित नाडकर्णी हे सावंतवाडी अर्बन बँकेसमोर उपोषणास बसणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा