सावंतवाडी वनविभागाचा निर्णय; प्रत्येक पर्यटकाला शंभर रुपये मोजावे लागणार….
आंबोली
जैवविविधता आणि जंगल सफर करणार्या पर्यटकांना आता आंबोलीच्या जंगलात सायंकाळी उशिरापर्यंत फिरण्यास सावंतवाडी वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र त्यासाठी भेट देणार्या संबंधित पर्यटकाला शंभर रुपये मोजावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय वनविभागाकडुन घेण्यात आला आहे. याची अमंलबजावणी करण्यात आली असून याबाबतचे अधिकार संयुक्त वनसमितीला देण्यात आले आहे. तर रात्रीच्यावेळी जंगलात फिरणार्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी वनपाल पूनम घाडगे, वनरक्षक अमृता पाटील, बाळा गावडे, मंगेश सावंत, श्री. सरमळलकर यांनी फलक लावले आहेत. याबाबत वनपाल पूनम घाडगे यांनी माहिती दिली आहे. “आंबोलीत जंगलात फिरण्यासाठी सध्या ५ ते ७ वाजेपर्यंत परवानगी आहे. त्यासाठी १०० रुपये प्रति व्यक्ती आकारले जाणार आहेत. ७ ते ९ वाजेपर्यंत परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव वरीष्टांकडे पाठवला आहे. सध्या ७ पर्यंत परवानगी आहे. वन उद्यान येथे १० रुपये फी घेतली जाणार आहे. वन व्यवस्थापन समिती कर आकारणी करून त्यासोबत गाईड देखील देणार आहे. वनविभागाच्या मार्गदर्शक सूचना देखील सांगण्यात येणार आहे. विनाकारण रात्री कोणी रिजर्व्ह फॉरेस्ट मध्ये आढळल्यास त्यावर वनविभागाची नजर असणार आहे.”