*प्रवाशांच्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर तोटा भरून काढण्यासाठी पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पास सुविधा उपलब्ध करण्याचा रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचा प्रस्ताव*
पुणे (गुरुदत्त वाकदेकर) :
मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह देशातील अन्य वंदे भारत एक्सप्रेसना प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभत असून ४० टक्क्यांहून अधिक सीट रिकाम्या राहत असल्याचे प्रसिध्दीमाध्यमांतून समजते.
या महत्वाकांक्षी एक्सप्रेसचा प्रवास आरामदायक व सुविधायुक्त असला तरी तिचे तिकिट दर अन्य एक्सप्रेस व सुपरफास्टच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. शिवाय, तिचा वेग देखील अन्य रेल्वे इतकाच असल्याने वेळेत देखील फारशी बचत होत नाही. या कारणांमुळे आता प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. परिणामी, वंदे भारत एक्सप्रेस तोट्यात जाण्याची रास्त चिंता रेल्वे प्रशासनाला पडली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आता देशातील सर्वच वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट दर कमी करण्याचा विचार करीत आहे.
वरील पार्श्वभूमीवर, पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला योग्य दरात मासिक पास सुविधा सुरु केल्यास, प्रवाशांची कमतरता भरून निघण्यास मदत होईल व पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तरी संघटनेच्या या प्रस्तावाचा रेल्वे प्रशासनाने व्यवहार्य व गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष इक्बाल (भाईजान) मुलाणी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
—————————————————————
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*