You are currently viewing “एक मूठ धान्य “उपक्रमांतर्गत वनवासी विद्यार्थी वसतीगृहास धान्य आणि धनादेश वाटप

“एक मूठ धान्य “उपक्रमांतर्गत वनवासी विद्यार्थी वसतीगृहास धान्य आणि धनादेश वाटप

निगडी प्राधिकरण – (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह, तालुका खेड राजगुरुनगर, जिल्हा पुणे, येथे विभागाच्या कार्याध्यक्ष सौ. अश्विनी अनंतपुरे, सहकार्याध्यक्ष सौ. वैदेही पटवर्धन, अध्यक्ष सौ. नेहा साठे, सचिव सौ. हर्षदा पोरे, कोषाध्यक्ष सौ. स्वाती जोशी, तसेच विभागाच्या सदस्य सौ. शितल गोखले, सौ. राधिका सुखटणकर अणि सौ. उज्ज्वला जाधव यांनी भेट दिली.

दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी “एक मूठ धान्य” उपक्रमाअंतर्गत जमा झालेले धान्य – ज्वारी, गहू, तांदूळ, मूग डाळ, शेंगदाणे आणि तेल वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे भेट देण्यात आले.

तसेच दान पात्र योजने अंतर्गत जमा झालेल्या रकमेचा धनादेश श्री. दिलीप देशपांडे, वसतिगृह पालक, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

वसतिगृह पालक, श्री. दिलीप देशपांडे, यांनी संस्थेची माहिती करून दिली. तसेच विभागाच्या कार्याध्यक्ष सौ. अश्विनी अनंतपुरे यांनी वरील उपक्रमांची माहीती सांगितली.

यावेळी संस्थेचे अधिक्षक श्री. अमोल सुधाकर डमरे तसेच सहाय्यक श्री. शिवराम काशिनाथ गवळी व सौ. उषा शिवराम गवळी उपस्थित होते.

वसतिगृहातील मुलांनी ‘आम्ही डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार’ हे पद्य सादर केले.यावेळी उपस्थित महिला सदस्यांनी त्यावर ताल धरला.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग कार्यकारीणी २०२३ च्या सचिव ॲड. सौ. हर्षदा पोरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी-बाबू डिसोजा यांना दिली.

 

———————————————————-

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा