You are currently viewing माणुसकी

माणुसकी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

*माणुसकी*

———————————

घड्याळात रात्रीच्या नऊचे टण ठण टण टण टोल पडले  तशी माझी चिंता अधिकच वाढली . माझेसमोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं . त्यांचा अंत्यविधी करायचा होता . पंधरा मजली या इमारतीत हजारों कुटुंबे होती , पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही . शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं . जो  तो आपापल्या कोषात मग्न . दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल काम्युटरवरील whats app , face book, twitter , instagram च्या आभासी जगात व्यस्त .

 

सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली , प्रत्येकाचे RIP , भावपूर्ण श्रध्दांजली , ईश्वर मृत्म्यास शांती देवो , तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती देवो , ओम शांती सारख्या मेसेजेसनी whats app फुल झालं . vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं , केलंय आपण सांत्वन हीच धारणा सगळ्यांची .पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही , मदत करणे तर दूरच.

 

बरे माझे नातेवाईकही भरपूर , सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे . बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं ,

 

” चांगल्या डाॅक्टरला दाखवा , ट्रिटमेंट करा ,काळजी करु नका , होतील बाबा बरे , अशा संदेशांनी , होय संदेशचं आभासी जगातला . कोणी video call वरही बोलले , पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार .

 

प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची .कोणाच्या घराचं बांधकाम , मुलांच्या परीक्षा , नोकरीतून रजा न मिळणं , कोणाचा भराला आलेला शेती हंगाम , अर्थात कोणी येणार नव्हतंच .

 

” अहो , काहीतरी करा ना . रात्र वाढतेय . पिंटू ही पेंगुळलाय . पण झोपत नाही आहे . आजोबांना सारखं उठवायला सांगतोय . कसं समजावू त्याला ”

 

” होय ग , मी प्रयत्न करतोय , कोणाला तरी बोलावतो मदतीला ”

साडेनऊचा टोल घड्याळाने दिला . हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं , जुन्या काळातलं , टण टण टोल देणारं , माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं , अनेकवेळा दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं

 

दुपारपासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले . जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले , ” नाही जमणार हो मला यायला , माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे , त्याला आणायला जायचंय ”

 

चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो , अरे भाईसाब मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे . उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे ..

 

तेराव्या माळ्यावरील मिलींद देवरे म्हणाला , ” आलो असतो रे , पण आज आमची मद्यपि कल्याण सभेची मिटींग असते दर रविवारी , प्रबोधनात्मक भाषण तर असतेच , पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते . घाबरु नकोस , धीर धर , स्वतःला सांभाळ .”

 

सी विंगमधील नेवासकरांकडे गेलो तर , अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं , अशा अशौच ( मौतीत जाणं , सुतकीय कार्य ) प्रसंगी आज नाही येता येणार मला .

 

शेजारचा ” स्वामीनाथन ” नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील ” सुत्रावे “विक एंडला गेलेला .

 

दुसर्‍या माळ्यावरील ” कोटनाके ” कवी संमेलनासाठी जाणार होते . प्रत्येकाची काही ना काही कामे . घाबरू नको , येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये .

 

काय करू , आज पावसानेही हैराण केलेलं . दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती , आता त्याचाही जोर वाढला होता . मला तर भडभडून आलं.

 

मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती . पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता .

 

शेवटी मनाचा निग्रह करून उठलो . माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता . हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता .

 

” संतोष ” माझा काहिसा कापरा , आर्त , दाटलेला , अवरूध्द स्वर ऐकून तो म्हणाला ” काय झालं साहेब , काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी ” ” अरे दुपारी बाबा वारले , आता दहा वाजत आलेत , अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही , मदतच नाही मिळाली रे मला कोठे ”

 

” ओह , बाबा गेलेत , आपण करू बाबांची अंतेष्टी , काळजी करू नका , माझे चार दोस्त आताच बोलावतो . करू आपण सगळं व्यवस्थित” . त्याने फटाफट मोबाईलवरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला . ” ये महेश , येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील , होय आपल्या बाबासारखेच आहेत ते , या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे , दिनेश , शिवा , आणि मधुकरलाही सांगशील , सगळं कसं फटाफट झालं पाहिजे , रात्र वाढतेय , पाऊसही हैराण करतोय.

 

संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्यापासुन तर तिरडी बांधण्यापर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली .

 

” मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो ” ” अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा , माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही , बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही .

 

चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली . बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला , संतोषनं मला सावरलं , माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत , मला मुखाग्नी द्यायला लावला , पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला . बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला .चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला , ” चला दादानु ,घरी चला , वहिनी वाट बघत्याल ” संतोषनं मला घरी सोडलं .

 

” येतो दादा ” ” थांब संतोष ” मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या , ” घे संतोष ” ” हे काय दादानु , पैसे नकोत मला .” ” अरे तुम्ही खर्च केलात , वेळेवर धावून आलात , ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती . याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे , पण शेवटी हा व्यवहार आहे , घ्या हे पैसे” ” दादानु , तुमचे बाबा आमचे बी बाबाचं की .नको मला पैसे , शेवटी काय असतं दादानु , माणूस मरतो हो , माणुसकी नाही .इथे व्यवहार गौण ठरतो दादा, .येतो मी , वहिनीस्नी सांभाळा , पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो .

 

बाहेर पाऊसही आता मंदावला होता . बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती .

या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती.

 

नरदेह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा ”

 

( ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यातील कथानक व पात्रांशी कोणी व्यक्ती , संस्थेचे नामसाधर्म्य आढळल्यास  तो योगायोग समजावा )

———————————————————————

डाॅ. शैलजा करोडे ©®

नेरूळ नवी मुंबई

मो.9764808391

 

————————————————-

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा