*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती उपाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*
*भरती आहे कां लूट*
आज वाढती लोकसंख्या ध्यानात घेता लोकसंख्या वाढली आणि जमीन कमी झाली लोकांना जगण्यासाठी रोजगार कमी झाला कमावते हात दोन आणि खाणारी तोंडे सहा होणारी मिळकत तुटपुंजी यामुळे अठठरा विश्व दारिद्र्य यांनी ग्रासलेली लोक. अर्धपोटी कधी उपाशी राहून आपल्या मुलांना शिक्षण देणारे पालक यांनी आज सर्व ठिकाणी शासनाच्या आडमुठ्या धोरणापुढे गुडघे टेकले आहेत. आज शिक्षणाची पध्दत सुशिक्षित वर्गाने निवडला आहे. म्हंजे प्रत्येकजण एम पी सी. यु पी सी. हेच शिक्षणाचे मार्ग निवडले आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा शिक्षण देणारे अॅकडमी वाले यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाळ पसरलं आहे. त्यातून मुलांची आणि पालकांची लुट सुरू केली आहे. वार्षिक फी. लोक व्याजाने काढून . उसणपासण करून अॅकडमी वाल्यांच्या मढयावर घालत आहेत.
आज बेरोजगार मुलांनी शासकीय क्षेत्रातील भरती सोडून उधोग यामध्ये लक्ष घालणं गरजेचे आहे. आज सर्व ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणारे परराज्यातील. गाड्या विक्री दुरुस्ती करणारे पराराजयातील. शासकीय अधिकारी जिल्हाधिकारी पर राज्यातील. कंत्राटदार ठेकेदार इंजिनिअर मोठ मोठे प्रकल्प बांधणारे प्रदेशातील आणि आपण तिथ कामाला. फर्निचर फरशी. बिल्डिंग मटेरियल विक्री करणारे परके. अश्या विविध ठिकाणी या लोकांनी आपला ठिय्या मांडला आहे. याला कारणीभूत आहोत आपण कारणं आपणांस काम करायचीच स्वःताच्या उद्योग धंदे करण्याची लाज वाटते.
आत्ता बाकी असलेली कसर शासनाने भरुन काढली ती म्हंजे विविध क्षेत्रातील भरतया निघत आहेत. यामध्ये जागा कमी आणि उमेदवार अर्ज पाच पट आहेत. आणि या भरती माध्यमातून फी नावाखाली शासन कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. म्हंजे त्या भरती मध्ये होणारे अधिकारी यांचा पगार आपल्याकडून काढला जात आहे.
सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित वर्षानंतर राज्यात तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त लागलाय. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली. २६ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. आज ज्यात २३ जुलै पर्यंत राज्यातील तब्बल 13 लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलै पर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केला तर एका जागेसाठी 275 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झालीय, याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा २० पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. एवढंच नाही तर हा आकडा येत्या दोन दिवसात अजून वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे एवढं शुल्क रक्कम मिळूनही परीक्षा पारदर्शक होत नाहीत, हा मागच्या काही परीक्षांचा अनुभव आहे. उस्मानाबाद मधील बाबासाहेब गाढवे यांनी आपल्यासह पत्नीचाही तलाठी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. दोघांचा एकदम अर्ज केल्याने कुटुंबाचे उदारनिर्वाहासाठी ठेवलेले दोन ते अडीच हजार रुपये खर्चाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे. उस्मानाबादच्या सह्याद्री रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा रामेश्वर बाबासाहेब कांबळे हे ग्रॅज्युएट आहेत, आपल्या आई-वडिलांचे छत्र हरवल्याने स्वतः काम करून उदरनिर्वाह चालवतात. त्यात त्यानं तलाठी पदासाठी फॉर्म भरला आहे, ज्याने त्याला मिळणाऱ्या पगारातील दीड हजाराची पदरमोड करा
राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्याची घोषणा झाली, मात्र ही घोषणा हवेतच जिरली. त्यानंतर होणारी ही पहिलीच भरती होय. त्यामुळे ही भरती वय वाढत चाललेल्या अनेक तरुणांना आशेचा किरण निर्माण करणारी आहे. त्यामुळेच तलाठी पदासाठी अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही अर्ज केले आहेत. बीएस्सी ऍग्री, एमएसस्सी बायोटेक आणि आता LLB ला तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या बालाजी शिंदे या तरुणानेही अर्ज केलाय. कितीही उच्च शिक्षण घेऊन संधीच दिसत नसल्याने हा पर्याय निवडल्याचे बालाजी सांगतो. बालाजीसारखीच अवस्था बी.कॉम,एम कॉम केलेल्या श्रीपाद दलालची झालीय. लग्नाचा विषय असो तसेच वय वाढत असल्याने आयुष्यात काही ना काही तरी व्हावे म्हणून हा खटाटोप करत असल्याचे सांगून हे उच्चशिक्षित तरुण नोकर भरतीच्या अनुषंगे सरकारी धोरणावर संताप व्यक्त करताहेत.. एकूणच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार वर्षांनुवर्षे शासकीय भरती काढत नाहीत. अन् काढली की बेरोजगार तरुण ती मिळवण्यासाठी तुटून पडतोय.
तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. तलाठीचे वेतन रु. 9300 / – ते जास्तीत जास्त रू. 34, 800 / – दरमहा. भत्ता आणि ग्रेड वेतन अद्याप जोडलेले नाहीत. तलाठी नायब तलाठी यांच्या वेतन श्रेणीनुसार रु. 9300 एवढे आहे.
राज्यात ४,१२२ तलाठी भरती अंतर्गत नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ पदे भरली जाणार आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाहीत. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.
दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातून एकच उमेदवार अर्ज करू शकतो. परीक्षा शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि आरक्षण प्रवर्गासाठी 900 रुपये असेल. खुल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 38 आहे, तर राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 आहे.
भरती प्रक्रिया मध्ये सर्वात मोठा साप सोडला आहे तो म्हणजे अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती. मागासवर्गीय. इतर मागासवर्गीय. अपंग आरक्षण. प्रकल्प ग्रस्त. भुकंप ग्रस्त. पुनर्वसन.अनुकंपा. अश्या विविध आरक्षण यामुळे हुशार आणि होतकरू मुलांना आज शासकीय क्षेत्रात संधी मिळत नाही. हे सर्व बंद होण्याची गरज आहे. सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे आपला गृहमंत्री यांच्या वशिल्याने आज बरेच ढ मुल सुध्दा अधिकारी बनले आहेत.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*