राजकारणविरहित आणि स्थानिक लोकांचा सहभाग असेल तरच विकास होतो – मंत्री दीपक केसरकर
आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
आंबोली
स्थानिक नागरिकांचा सहभाग असतो तेव्हा विकास होतो त्यासाठी राजकारणाची पक्षीय पादत्राणे बाहेर काढून एकत्र आले पाहिजे. कावळेसाद येथे हँग ग्लायडिंग या परदेशी खेळासाठी मोठी संधी आहे.अडव्हेंचर स्पोर्ट साठी चांगले ठिकाण आहे.त्याठिकाणी देखील प्लॅनिंग केले आहे निधी मंजूर केला आहे.इथला वन जमिनीचा प्रश्न देखील लवकरच सोडवू.जिल्ह्यातील पहिल्या फाईव्ह स्टार हॉटेल चे मोचेमाड येथे २ महिन्यात उदघाटन करू असे प्रतिपादन आंबोली येथे वर्षा पर्यटन महोत्सव निमित्त उदघाटन प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
आंबोली येथे महाराष्ट्र टुरिझम संचनालय यांचा वर्षा पर्यटन महोत्सव ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.त्या उदघाटनावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,भाजपचे माजी आमदार राजन तेली,जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत,पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,पर्यटन प्रकल्प अधिकारी हनुमंत हेडे,उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी,तालुकाध्यक्ष नारायण राणे,सरपंच सौ.सावित्री पालेकर,मालवणचे बाबा मोंडकर, सुभाष गोसावी,आंबोली गावकरी शशीकांत गावडे,पोलीस पाटील विद्या चव्हाण,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक संदीप गोसावी,व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच शिंदे शिवसेना कार्यकर्ते विशाल बांदेकर,जगन्नाथ गावडे,विलास गावडे,भाजप पदाधिकारी, चौकुळ चे सरपंच बाबू शेटये,भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे दिपप्रज्योलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यानंतर व्यासपीठावरून बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, वनविभागाने इलेक्टरिक गाड्यासाठी प्रस्ताव द्यावा. विकासासाठी वनविभागाने थोडे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.शिरोड्यातील प्रश्न देखील महिन्यापूर्वीच सोडवला मात्र प्रसिद्धी केली नाही”यावेळी माजी आमदार राजन तेली म्हणाले,इथले तरुण नोकरीसाठी गोव्यात जातात इथेच रोजगार मिळाला तर गोव्यात जाण्याची आवश्यकता नाही.इथे पर्यटनातून विकास होऊन 3 ते ४ दिवस पर्यटक राहण्यासाठी इथे विकास झाला पाहिजे.प्रशासनाने देखील पर्यटनातून जिल्ह्याच्या विकासासाठी खूप जास्त प्रयत्न केले पाहिजे.”जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या,२ महिन्यांपूर्वी चिपी येथे उडघाटनसाठी पर्यटन चे एमडी आणि सचिव आले होते तेव्हाच जिल्ह्याचा पर्यटन महोत्सव ठरला होता.जगात जी प्रमुख ठिकाणे आहेत त्यांच्याच नावाने महोत्सव होतो त्याप्रमाणे आंबोलीच्या नावाने महोत्सव होणे हा या मागचा उद्देश आहे.दरवर्षी तो सुरू राहावा.आंबोलीसाठी वनअमृत प्रकल्प मंजूर केला आहे.फुलपाखरू आणि वन उद्यान नूतनीकरण मंजुरी दिली आहे.जंगलसफारीसाठी पर्यटकांना सायकल घेण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.नेचर इंटरप्रिटेशन हा प्रकल्प मंजूर केला आहे.आणखीही योजना ना मंजुरी देण्यात आली आहे. आंबोली पर्यटन वेबसाईट आणि पर्यटन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.छापलेली २०० पुस्तके केसरकर यांनी विकत घेतली. आपल्यातर्फे ती पर्यटकांना द्या आणि एक फुल भेट द्या.आंबोली पर्यटन महोत्सव ला स्थानिकांनी देखील पाठ फिरवली.टूर ऑपरेटर किंवा पर्यटकांची देखील संख्या जास्त नहोती.त्यामुळे लाईमलाईट सजावटीचा फायदा झाला नाही.व्हेन्चर या अंधेरी मुंबईच्या कंपनीला ठेका दिला आहे.बॅनर बाजी केली उदघाटन साठी जवळपास २० लाख खर्च एकूण २ कोटी यावर खर्च करण्यात येणार आहे मात्र त्याठिकाणी एवढा पोलीस बंदोबस्त किंवा स्थानिक लोकांना साधा चहा देखील नहोता.त्यामुळे सर्वांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान या कार्यक्रमात उपसरपंच दत्तू नार्वेकर हे अनुपस्थित होते त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.ग्रामपंचायतीत हस्तक्षेप आणि त्याठिकाणची नाराजी उघड झाली आहे त्याचीच चर्चा होती. मात्र त्यांना संपर्क केला असता पुण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमसाठी कुडाळ येथील रुचिता शिर्के आणि बादल चौधरी यांनी उत्कृष्ट निवेदन सादर केले.