You are currently viewing चित्र काढून करणार मणिपूर हिंसाचाराचा निषेध; अखंड लोकमंचतर्फे आयोजन

चित्र काढून करणार मणिपूर हिंसाचाराचा निषेध; अखंड लोकमंचतर्फे आयोजन

कणकवली

देशातील महिलांवर होणारे अत्याचार व मणिपूरमधील हिंसाचाराचा रविवारी 13 आँगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात चित्रकार चित्र काढून निषेध करणार आहेत. याचे आयोजन अखंड लोकमंचतर्फे करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मणिपूर येथे घडलेल्या आणि एकूणच देशभरात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात दृश्य कलाकारांकडून निषेध व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आपण ‘अखंड लोकमंच कणकवली’ द्वारे आयोजित करीत आहोत.
सदरच्या दिवशी कलाकारांनी चित्राच्या माध्यमातून त्या घटनेच्या विरोधात व्यक्त होणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
घडलेल्या या अमानवी घटनेचा जगभरातून निषेध उमटत असताना भारतीय कलावंत मात्र मूग गिळून गप्प का आहेत हा प्रश्न संवेदनशील मनाला पडतो आणि त्याचे उत्तर इतरत्र शोधत न बसता आपणच सर्वांनी आपल्या जाणीवा जीवंत आहेत हे याद्वारे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे, असे आम्हास वाटते.
आपण सर्वांनी या उपक्रमात उपस्थित रहावे व कृतीशील सहभाग घ्यावा. समविचारी कलाकारांना सोबत आणावे असे आवाहन अखंड लोकमंचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा