You are currently viewing क्रेडाईच्या राज्य कार्यकारणीवर अभिजित जैतापकर यांची निवड

क्रेडाईच्या राज्य कार्यकारणीवर अभिजित जैतापकर यांची निवड

सिंधुदुर्ग :

 

कॉन्फेडरेशन ऑफ रियल एस्टेट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाईच्या राज्य कार्यकारणीवर सिंधुदुर्ग क्रेडाईचे सचिव अभिजित जैतापकर यांची निवड करण्यात आली असून सिटी ब्रॅन्डीग आणि टुरिझम या कमिटीवरही त्यांची निवड करण्यात आली आहे.क्रेडाई ही देशपातळीवर काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या संघटनेचे काम क्रेडाई महाराष्ट्र संघटना करत असते. नुकतीच या संघटनेची सन २०२३-२५ साठी राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या मध्ये क्रेडाई सिंधुदुर्गचे सचिव अभिजीत जैतापकर यांची सिटी ब्रॅन्डीग आणि टुरिझम या कमिटीवर निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल क्रेडाई सिंधुदुर्गच्या सर्व सदस्यांतर्फे अभिजीत जैतापकर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना अभिजीत जैतापकर यांनी आपल्या निवडीबद्दल क्रेडाई महाराष्ट्रचे विशेष आभार मानले आणि असेच आपल्या जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांचे शासनस्तरावरील प्रश्न क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आणि त्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आपण कायम उपलब्ध राहीन अशी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा