इचलकरंजी : प्रतिनिधी
ऑल जर्नालिस्ट ॲन्ड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पञकार संघटनेच्या वतीने यंदाच्या वर्षीचा सामाजिक व परिवर्तनवादी चळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक साथी संजय रेंदाळकर यांना दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती श्रमभारती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
इचलकरंजी येथील संजय रेंदाळकर हे मालती विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापक कार्यरत असून राष्ट्र सेवा दल , संविधान जागर , अंधश्रद्धा निर्मूलन व जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय अशा कार्यातून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.या कार्याची दखल घेऊनच त्यांची ऑल जर्नालिस्ट ॲन्ड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पञकार संघटनेच्या वतीने दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती श्रमभारती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि.१८ ऑगस्ट रोजी देवरुख ( रत्नागिरी )येथील पार्वती पॅलेस हाॅटेलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.