*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*मी देशाला बांधिल आहे का? कसा?*
अगदी आपल्या अंतर्मनाला हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने
विचारायला हवा.किती जण खरे उत्तर देतील आपल्याला
माहित नाही.पण प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न विचारायला हवाच.
“ बंधु आणि भगिनिंनो” एकाच वाक्यात जगाला भारताची
खरी ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद…
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी
मिळवणारंच”! लोकमान्य टिळक.
“पुन:श्च हरि ओम्”लोकमान्य टिळक.
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?”लोकमान्य टिळक.
“मेरी झॅांशी नही दूंगी”झाशीची राणी”.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरमिटणाऱ्या व अनेक आघाड्यांवर
अन्याय अत्याचार सोसणाऱ्या भगतसिंग राजगुरूंसारख्या
असंख्य विरांची व स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश सरकारशी
रोज वर्तमान पत्रातून टक्कर देणाऱ्या टिळक आगरकरांसारख्या जीव पाखडणाऱ्या लढवैय्यांची आज ही
आठवण काढताच रक्त सळसळायला लागते एवढी ताकद
त्यांच्या बोलण्यात होती.वरील पैकी एक जरी वाक्य कानावर
पडले तरी आजही आपले रक्त खवळते कारण त्यांची
देशाप्रती मायभूमी प्रती असलेली निष्ठा व बांधिलकी आपल्याला प्रकर्षांने जाणवते.
याला म्हणतात बांधिलकी. सावरकरांच्या घराण्याने देशहिता
साठी तरूणपणातच घरादारवर तुळशीपत्र ठेवले व त्यांच्या
संसाराचा होम झाला.
अगदी पूर्वी गुप्त मौर्य घराण्यांनी राजवटींनीही हे काम अगदी
चोख केले. सीमेवर जगज्जेता सिकंदर आला व इथेच खपला.
शिवाजी महाराजांचा पराक्रम तर शब्दात मावणारा नाही हे
आपल्याला सर्वांना माहित आहे. स्वराज्यनिष्ठा शिकावी तर
ती त्यांच्याकडूनच! ही बांधिलकी नसानसात रक्तात असावी
लागते. ती कुठूनही बाहेरून उसनी आणता येत नाही. ते
बाळकडू जन्मत:च पोटात पडावे लागते तेव्हा ही स्वराज्य
निष्ठा निर्माण होते.टिळक त्यांच्या जहाल लेखांमुळे तुरूंगात
गेले व त्यांची रवानगी दूर मंडालेला झाली.सहा वर्षे कोणतीही
सुखसुविधा नसतांना अत्यंत हालाखीत तब्बेत ढासळत
असतांना “गीतारहस्य” सारखा अजोड ग्रंथ लिहिणे चेष्टा नव्हती.त्या साठी ही देशबांधवांप्रती निष्ठाच असावी लागते,
व देशाप्रती बांधिलकी! या देशाचे देशबांधवांचे मायभूमीचे
आपण काही देणे लागतो व त्या शिवाय आपण मरूही शकत
नाही हे त्यांना चांगलेच माहित होते.(एकूण सहा ग्रंथ आहेत
त्यांचे).
रामदासांनी सुद्धा दासबोध लिहून काय केले तर समाजऋण
फेडले. समाज विस्कळीत होऊ नये म्हणून ठिकठकाणी
मारूतीरायाची प्रतिष्ठापना केली.म्हणजे जे जे संत होऊन
गेले ते सुद्धा समाजाप्रती देशाप्रती आपली कर्तव्ये विसरले
नाहीत.
देशाप्रती आपली दोन प्रकारची बांधिलकी असते.
1. देश पारतंत्र्यात, गुलामीत असेल तर काही ही किंमत चुकवून त्याला मुक्त करणे, जे वरील आपल्या देशभक्तांनी केले.
2. दुसरे कर्तव्य, बांधिलकी त्या नंतर सुरू होते ती म्हणजे
देश बांधणे, सुस्थितीला आणणे, त्याची घडी बसवणे.
आपले पूर्वसुरी देशऋण फेडून गेलेत व उरलेले कार्य आपल्यावर सोपवून गेलेत.
या देश बांधणीत मग शिक्षणापासून ते….. संरक्षणापर्यंत
सारे विषय येतात ज्या साठी आपल्याला काम करायचे आहे.
देशाचा आर्थिक व सांस्कृतिक स्तर कसा उंचावेल व त्या साठी
आपण किती प्रयत्नशील आहोत? देशाची खरेच आपल्याला
काळजी आहे का? हे सारे प्रश्न त्यात येतात.
आपण काही सीमेवर जाऊन लगेच देश सेवा करा असे कुणी ही
म्हणणार नाही पण दैनंदिन जीवनात आपण आपल्या संसारात
व्यस्त असतांना देशहित डोळ्यासमोर ठेवून काय योगदान देतो
हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा. पगार घेऊन आपण जे
काम करतो त्याशिवाय एक तास तरी देशाच्या कामाला देतो
का? मला आठवते, मी शाळेत असतांना १५ॲागष्ट व २६ जाने. या दोन दिवशी आमची शाळेतून प्रभातफेरी निघायची.
वंदे मातरंम म्हणत गावाला फेरी मारून झाली की आम्ही सारे
विद्यार्थी ग्रामसेवा करत असू.आपली शाळा आपले गाव स्वच्छ
ठेवणे म्हणजे आपला देश स्वच्छ ठेवणे नव्हे काय? त्या साठी
आज आम्हाला स्वच्छता अभियान का राबवावे लागते? आपला परिसर, अंगण, गाव पर्यायाने देश स्वच्छ ठेवावा हे
आम्हाला कळत नाही? कळते हो पण वळत नाही ना?
त्याचे काय करायचे?गाडगे बाबा सुद्धा रात्रंदिवस सामाज
मने व ग्रामसफाईचे काम करत होतेच ना?मग आमची
बांधिलकी काय फक्त १ तारखेला मिळणाऱ्या पगाराशी आहे
काय?
नाशिकला आदिवासी खेड्यांवर आदिवासींना घरपोच पाणी
देणारी प्रमोद गायकवाडांची सोशल नेटवर्किग सर्विस आहे.आता पर्यंत
डोंगरदऱ्यात पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असणाऱ्या ३० ते ४०
गावांना त्यांच्या यंत्रणेद्वारे त्यांनी पाणी पुरवठा सुरू करून दिला आहे.त्या सोशल नेटवर्क संस्थेचे आम्ही पण मेंबर आहोत.
हा माणूस स्वत:ची नोकरी सांभाळून, अनेक दानशूर व्यक्तिंच्या सहभागातून (समाजात अनेक दानशूर आहेत,
फक्त त्यांची खात्री पटली पाहिजे की, आपले दान योग्य
ठिकाणी खर्च होते आहे)हे नडलेल्या लोकांपर्यंत पाणी
पोहोचवण्याचे काम करत आहेत. आम्ही आर्थिक भार
उचलतो.त्या योजनेच्या उद्घाटनाला २/३ आदिवासी खेड्यात
गेलो असता आम्ही ती दुर्गम खेडी, (अतिउंचावरची)पाहून थक्क झालो.अजून अशी अनेक उदा. मी देऊ शकते.पर्सनल
लेव्हलवरही मला जमेल तसे काम मी करत असते कारण
हे बाळकडू मला वडिलांकडून मिळाले आहे.
अशा उर्मिने झपाटून साऱ्या देशबांधवांनी देशासाठी बांधिलकी
मानून काम केले तर मला वाटते देशात एकही प्रश्न शिल्लक
राहणार नाही.अहो, आम्ही जेव्हा लोकसंख्या जास्त आहे
असे म्हणतो, तेव्हाही आम्ही त्यात नसतो. कळलं का? आम्ही
सर्व आमच्या सोयीने बोलतो व वागतो.प्रत्येकाने फक्त आपल्या स्वत:ला तपासून पाहिले व आपण यात कुठे बसतो
याचा शोध घेतला तरी बरे होईल.तसा शोध प्रत्येकाने घ्यावाच.
अहो, आपल्या घरी बसून तुम्ही ही कामे करू शकता. देश
म्हणजे राज्य, देश म्हणजे समाज, म्हणून समाज सेवा म्हणजे
च देशसेवा होय नाही का? मग किती लोक ती करतात.आपण
फक्त मागण्या करतो व खिसे भरतो हा माझा आरोप आहे व
कुणीही तो खोडून काढण्याची गरज नाही.अज्ञान, शिक्षणाचा
अभाव, बेरोजगारी, अंधश्रद्धा,उपासमार, पाण्याच्या गंभीर समस्या, वृक्षतोड, पर्यावरण हानी, प्रदूषण, हजारो समस्या
आ वासून आपल्या समोर उभ्या आहेत. पडतो घराबाहेर आपण हे प्रश्न हाताळायला? आपल्या सात पिढ्यांची सोय
कशी होईल एवढा एकच प्रश्न आपल्या समोर असतो व
तो सोडवण्यातच आपण रक्त आटवतो, बाकी देशाशी वगैरे
आपल्याला काही घेणे नाही, बघताय नां? कसा
खेळखंडोबा चाललाय् तो? वा किती चिंता आहे ना आपल्याला देशाची?
मला तर काय बोलावे हेच कळत नाही, असे आपले हे हितचिंतक पाहून? हे काय नि आपण काय? काय देशाचे
भले करणार? प्रश्नच आहे मोठा! आपण इतके मशगुल
आहोत की,पर्यावरण इतके ढासळले आहे तरी अजून
आपण त्याकडे गांभिर्याने पहात नाही आहोत.देव करो
नि आपल्याला जाग येवो व आपण आजपासून देशासाठी
काही तरी प्रण करो.
विषय फार मोठा आहे. थांबते.
अर्थात, ही माझी नि फक्त माझी मते आहेत.
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
दि: ९ ॲागष्ट २०२३
वेळ : रात्री ८/३६
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
https://sanwadmedia.com/105608
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*