You are currently viewing देवगड इळये-मिठमुंबरी-कुणकेश्वर जाणाऱ्या एसटी बसेस सोडा…

देवगड इळये-मिठमुंबरी-कुणकेश्वर जाणाऱ्या एसटी बसेस सोडा…

ग्रामस्थ आक्रमक; देवगड आगार व्यवस्थापकांकडे केली मागणी…

देवगड

इळये-मिठमुंबरी-कुणकेश्वर या ठिकाणी जाणाऱ्या एसटी बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आज मीठमुंबरी ग्रामस्थांच्यावतीने देवगड आगाराव्यवस्थापन कडे करण्यात आली. वेळेत गाड्या सोडल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना नाहक आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत योग्य ते नियोजन व्हावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत आज ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, आमच्या गावातील एस.टी. सेवा गेल्या एक वर्षापासून बंद आहे. आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम खडीकरण डांबरीकरण करून पूर्ण झाले आहे. सध्या ४ एस टी सुरु असून बाकीच्या बस सेवा अद्याप पर्यंत सुरु झाल्या नाहीत. तसेच ९.०० वाजता सुटणारी देवगड कुणकेश्वर ही गाडी कधी कधी मिठमुंबरी मार्गे येते. त्यामुळे हायस्कूलव्या मुलांचा पास असूनही चालत जावे लागते. तसेच इतर ग्रामस्थांना रिक्षा वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड येथील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. तसेच शाळा व कॉलेज चालू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही बसफेरी उपलब्ध नाही ही गैरसोय लक्षात मिठमुंबरी मार्गे सर्व बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी यानिवेदनाव्दारे करण्यात आली.

यावेळी सरपंच बाळकृष्ण गांवकर उपसरपंच शिवसेना युवा तालुका गणेश गांवकर ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंबरकर, ग्रामस्थ हेमंत तोडणकर, हेमंत गांवकर.स्वप्निल तोडणकर, अनिल मुंबरकर.तुळशीदास डामरी, सौरभ डामरी, निळकंठ गांवकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा