वेंगुर्ला
श्री महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय परुळे आणि काळसे पंचक्रोशी दिव्यांग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे येथे दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. वराठी मंगल कार्यालय परुळे येथे शनिवार दि.१९ आॕगस्ट २०२३ रोजी दु.२ ते ५ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
या शिबीरात दिव्यांगाची कान, नाक, घसा, डोळे यांचे व्यंग तसेच शारिरीक आणि अस्थिव्यंग याची पूर्णतः मोफत तपासणी करण्यात येणार असुन आवश्यक वाटल्यास पुढील उपचारही मोफत करण्यात येतील. या आरोग्य शिबीरात तपासणीसाठी निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक तसेच एस.एस. पी. एम. लाईफटाईम हाॕस्पिटल,पडवे सिंधुदुर्ग चे अधिष्ठाता मा.डाॕ.श्री. आर. एस. कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील इतर तज्ञ डाॕक्टर उपस्थित रहाणार आहेत.
या शिबिरात परुळे पंचक्रोशी,पाट म्हापण कोचरा,निवती या नजिकच्या गावातील दिव्यांग सहभागी होऊ शकतात. शिबिरात सहभागी होणा-या दिव्यांगानी १६ आॕगस्ट पर्यंत आपली नावनोंदणी करावी तसेच येताना आपली यापुर्वी तपासणी केलेली असल्यास ती कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. या शिबीरा बाबत अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी गिरीष आमडोसकर (मो.9422166670) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.