You are currently viewing सावंतवाडीत १५ रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

सावंतवाडीत १५ रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

सावंतवाडी

सावंतवाडी बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी बाजारपेठेतील जयप्रकाश चौक येथील आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई व मालिकावीर यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. या सहभाग घेणाऱ्या संघाने १४ ऑगस्टपर्यंत आपल्या संघाची नावे मंडळाचे पदाधिकारी नंदू गावकर – ९४२०२६२००१ व शैलेश गडकर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा