You are currently viewing तिरवडे पूर्ण प्राथमिक शाळेत रानभाजी व तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन

तिरवडे पूर्ण प्राथमिक शाळेत रानभाजी व तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन

मालवण ,:

 

मालवण तालुक्यातील तिरवडे पूर्ण प्राथमिक शाळेत रानभाजी व तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माता पालक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्पर्धा परीक्षण विषयतज्ञ आरती कांबळी व नांदोस गावकरवाडा चे शिक्षक चंद्रसेन पाताडे यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा वंटे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विकास गावडे, उपशिक्षिका उन्नती कराळे व शिक्षक किरण चेंडगे उपस्थित होते.

तृणधान्य पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम.रुपाली गावडे (नाचणी इडली व बाजरी खीर),द्वितीय क्रमांक श्रीम.सुषमा कदम(ज्वारीचे अप्पे),तृतीय क्रमांक श्रीम.अमेया मुळीक (पौष्टीक धिरडे) यांनी पटकावला. तर रानभाज्या पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम.सुवर्णा तिळवे (कुडाच्या शेंगाची भाजी),द्वितीय क्रमांक श्रीम.भागीरथी तिळवे (एका पानाची भाजी),तृतीय क्रमांक श्रीम.अनुष्का गावडे(फागलाची भाजी) यांनी पटकाविला.यावेळी विजेत्यांना वस्तूरुप बक्षिसे देण्यात आली.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना वस्तूरुप भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या.रेखा वंटे यांनी केले. सूत्रसंचालन उन्नती कराळे यांनी तर आभार प्रदर्शन किरण चेंडगे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा