दोडामार्ग
तालुक्यात अनेक ठिकाणी नदी , ओहोळावर नवीन पूल बांधले गेले;मात्र पुलांच्या जोडस्त्यांकडे ठेकेदार व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना पावसाळ्यात जोडरस्त्यातील खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे.
एखाद दुसऱ्या पावसात वाहने जाऊन जोडरस्ते बऱ्यापैकी दबायला हवेत मग खडीकरण डांबरीकरण योग्य रीतीने करता येते अशी मखलाशी ठेकेदार व बांधकामचे अधिकारी नक्की करतील;पण त्याआधी खड्डे बुजवून वाहनचालक आणि प्रवाशांचा त्रास कमी केला तर काय अडचण आहे अशी विचारणा वाहनचालकांनी केली तर नवल वाटू नये.
तेरवण मेढे, साटेली भेडशी, झरेबांबर अशा अनेक ठिकाणी नवीन पूल झालेत.काही पूल दोडामार्ग तिलारी बेळगाव मार्गावर तर काही अंतर्गत मार्गावर आहेत.सगळ्याच पुलावरुन अव्याहत वाहतूक सुरू असते.त्यामुळे जोडरस्त्याला खड्डे पडले आहेत.मुळात जोडस्त्याचे काम करताना त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिले गेले नाही.त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने जोडरस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी होत आहे.