*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*—— भारूड ——*
सामान्य लोकांना सहज व सोप्या भाषेत अध्यात्माची शिकवण देण्यासाठी संतांनी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या आणि त्यातील जनसमुदायासमोर नाटय़मय रीतीने सादर केली जाणारी रूपकात्मक रचना म्हणजे भारूड होय..
जनतेचा उद्धार व्हावा सकळ जनांनी शहाणे व्हावे जे आपल्याला अनुभवायला मिळाले त्याचा लाभ इतरांना घेता यावा.या सात्त्विक विचारातून भारुडांचा जन्म झाला.. भारुडाचे प्रकार म्हणजे सोंगी भारूड आणि भजनी भारूड होय..
बहुरूढ’ या शब्दाचा अपभ्रंश ‘भारूड’ झाला असेही काहींचे मत आहे..
“भारूड”’ या शब्दाची निश्चित उत्पत्ती सांगणं कठीण आहे… ‘”भा’” म्हणजे तेज त्यावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशीही व्युत्पत्ती मानली जाते… परंतु यापैकी कशालाच ठोस पुरावा किंवा आधार नाही मात्र याची गेयता म्हणजे लोकसंगीतातील गेयता… ! करमणूक करून घेताना देखील अध्यात्माचे अनुसंधान सुटू नये हाच भारुड रचनेचा मुख्य हेतू…! यासोबतच भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज प्रचलित आहे…
महाराष्ट्रातील लोककलांमध्ये ‘भारूड’ हा प्रकार अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भक्तिसंप्रदायातील एक लोकप्रिय भक्तिनाटय म्हणून भारूड लोकमानसात अतिशय प्रिय आहे. ‘बहुरूढ’ ते भारूड असे म्हटले जाते.
भारुडाचे नाव घेताच आपल्यासमोर एकनाथांचे नाव येते परंतु त्यांच्या आधी ज्ञानेश्वर, नामदेव यांनी भारुडे लिहिली आहेत. नंतर तुकाराम, रामदास यांनीही भारुडे लिहिली…
त्याबरोबरच महिपती नाथ , देवनाथ, दत्तसंप्रदायातील दासोपंत, महानुभाव यांनीही भारुडे रचली असली तरीही भारुडे म्हंटली की आपल्यासमोर संत एकनाथांचे नाव डोळ्यासमोर येते…
संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले… भारूडातील विषय हे सर्व सामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे .. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून आलेले आहेत…
एकनाथांच्या भारुडाचे वर्णन आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत असे केले जाते… नाथांच्या भारुडांची संख्या जशी विपुल आहे.. तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे संत एकनाथ जे अचूक वर्णन करतात ना त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते.. शिवाय साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय ते ज्या प्रकारे व्यक्त करतात त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होते…
भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतलामहाराष्ट्रातील लोककलांमध्ये ‘भारूड’ हा प्रकार अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भक्तिसंप्रदायातील एक लोकप्रिय भक्तिनाटय म्हणून भारूड लोकमानसात अतिशय प्रिय आहे. ‘बहुरूढ’ ते भारूड असे म्हटले जाते.
भारुडाचे नाव घेताच आपल्यासमोर एकनाथांचे नाव येते परंतु त्यांच्या आधी ज्ञानेश्वर, नामदेव यांनी भारुडे लिहिली आहेत. नंतर तुकाराम, रामदास यांनीही भारुडे लिहिली.
जनतेचा उद्धार व्हावा सकळ जनांनी शहाणे व्हावे जे आपल्याला अनुभवायला मिळाले त्याचा लाभ इतरांना घेता यावा.या सात्त्विक विचारातून भारुडांचा जन्म झाला..
भारुडाचे साधारणपणे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात… त्यापैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे तर कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो जसे की चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे’ किंवा ‘मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती…’यासारख्या कूट रचना होत…
संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले…भारूडातील विषय हे सर्व सामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे .. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून आलेले आहेत…
भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला..
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020