कणकवली
पंतप्रधान पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये आपण केलेल्या परसबागेतील भाजीचा आस्वाद घेता यावा याकरिता केंद्रशाळा शेर्पेमध्ये जुलै महिन्यातच परसबागेची निर्मिती करण्यात आली .या परसबागेमध्ये भेंडी ,वांगी, मिरची हळद ,लाल माठ ,हिरवा माठ , चिबुडवेल ,दोडक, पडवळ इत्यादी भाज्यांची लावण करण्यात आलेली आहे .त्याबाबत कृषी सेवक सागर चव्हाण यांनी केंद्रशाळा शेर्पेच्या परसबागेला भेट देऊन समाधान व्यक्त केले .शाळेची जमीन खडाकाळ असून बाहेरून माती आणून गादीवाफे करून चांगल्या प्रकारचे प्रयत्न केल्याचे गौरवोद्गार सागर चव्हाण व श्री गोवळ यांनी काढले . केलेल्या भाजीची वाढ होण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करून परसबागेमध्ये लवकर वाढ व्हावी याकरिता काही मार्गदर्शनपर सूचनाही दिल्या . परसबाग निर्मितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे शिक्षकवृंद – कविता हरकुळकर, अमरीन शेख ,मोहिनी पाटील , स्वयंपाकी सोनाली पवार ,मानसी शेलार व सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे पालक – देवेंद्र शेलार ,महिमा शेलार ,मंगेश कांबळे यांचे विशेष योगदान लाभले .