मालवण :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपानिमित्त “माझी माती माझा देश” या मोहिमेअंतर्गत दिनांक 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक), वीरोंको वंदन, हर घर तिरंगा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
“माझी माती माझा देश” या मोहिमेअंतर्गत शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविदयालय, बचतगट यांनी दिनांक 09/08/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रंचप्रण शपथ घेण्यात आलेली आहे. “माझी माती माझा देश” या मोहिमेत सहभागी होऊन श्री. संतोष जिरगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी व सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रंचप्रण शपथ घेतली. तसेच मालवण तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग, स.का.पाटील सिंधुदुर्ग कॉलेज, जिल्हा परिषद धुरीवाडा शाळा, देऊळवाडा शाळा, रेवतळे शाळा, देसाई स्कूल, टोपीवाला हायस्कूल, कन्याशाळा, भंडारी हायस्कूल, रोझरी चर्च, जय गणेश स्कूल शिक्षक व विदयार्थी, मालवण शहरातील सर्व बचतगट, सर्व सरकारी कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी यांनी या मोहितेअंतर्गत पंचप्रण शपथ घेतलेली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत शासनाने सूचना दिलेल्या असून या निमित्त दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रत्येक नागरीकांनी आपले घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. सदरचा तिरंगा आपणास पोस्ट ऑफीस, मालवण या ठिकाणी रुपये 25/- शुल्क भरुन उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी यांचे वतीने करण्यात आलेले आहे.
मुख्य अधिकारी तथा प्रशासक
मालवण नगरपरिषद