छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज यांच्या पेक्षा औरंग्या मोठा होता हे दाखवण्याचे सुरू आहे षडयंत्र
*लेखक भालचंद्र नेमाडे या षड्यंत्राला घालत आहेत खत पाणी,आमदार राणे यांचा आरोप
कणकवली
औरंगजेब हा हिंदुद्वेषी होता. त्याने हिंदूंची मंदिरे तोडली. हिंदू महिलांवर आणि समाजावर अतोनात अन्याय केले. अशा अन्यायाविरोधात लढा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.औरंग्याच्या विरोधात संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडून धर्मांतर करण्यास औरंगजेबास स्पष्ट नकार दिला. धर्मांतराला विरोध केला. छत्रपती संभाजी महाराज औरंग्या समोर झुकले नाहीत. अशा औरंगजेबाला मोठे करण्याचे षडयंत्र महाराष्ट्र राज्यात चालू आहे आणि त्याला खत पाणी घालण्याचे काम लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे लोक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि आदर्श आहेत.यांना औरंग्या पेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. अशा लोकांना देशात पुरस्कार देऊ नयेतच आणि दिलेले पुरस्कार परत घ्यावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.
आमदार नितेश राणे कणकवली ओम गणेश नमस्ते पत्रकारांशी बोलताना ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या औरंगजेबावरील वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. ते म्हणाले औरंगजेबाने जुलूम केले, अत्याचार केले, अशा औरंग्याला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजायचे आणि छत्रपतींना इतिहासात लहान करायचे असे जे षडयंत्र चालू आहे. त्याला भालचंद्र नेमाडे हे खतपाणी घालतात औरंग्या हिंदू द्वेषी नहोता असे सांगून नेमाडे यांना औरंगजेबाची महती वाढवायची आहे. असेल प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.