You are currently viewing लेटस् चेंज’ हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी नि: शुल्क करावा..

लेटस् चेंज’ हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी नि: शुल्क करावा..

 *शिक्षक भारती सिंधुदुर्गची शिक्षण संचालकांकडे मागणी*

 

तळेरे : प्रतिनिधी

 

विद्यार्थ्यांसाठी अतिशय संस्कारक्षम असलेला आणि स्वच्छता मिशन वर आधारित असलेला बहुचर्चित चित्रपट ‘लेटस चेंज’ या चित्रपटाच्या तिकीट दराबाबत शासनाने फेर विचार करून निःशुल्क दराने प्रत्येक विद्यार्थ्यांना दाखवावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी व माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

‘लेटस चेंज’ हा चित्रपट स्वच्छता मिशन वर आधारित असल्याने सर्व शाळा मध्ये दाखविण्या बाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

सदर चित्रपट पहाण्यासाठी प्रति विद्यार्थी 20 वीस रुपये आकारणी करण्याबाबत पत्रात उल्लेख आहे. खरतर हा चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत दाखविणे आवश्यक होते तसे न करता शासनाने प्रति विद्यार्थी 20 रुपये दर लावून विद्यार्थी व पालकांवरती अन्याय केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रामीण डोंगरी भाग आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते अशा स्थितीत चित्रपट पाहण्यासाठी हा दर लावलेला योग्य वाटत नाही.

तरी हा चित्रपट अगदी नाममात्र दरात प्रति विद्यार्थी दाखवावा जेणेकरून विद्यार्थी हा चित्रपट पाहतील व स्वच्छतेचे पालन करतील . तरी कृपया सदर शुल्क कमी करावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा