भरत जाधव यांना तितिक्षा इंटरनॅशनल तर्फे तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी – सौ. वसुधा वैभव नाईक.
पुणे :
तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे आयोजित पहिले तितिक्षा राष्ट्रीय साहित्य संमेलन आज रोजी संपन्न झाले. हे संमेलन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक , कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन भावकवी वि.ग.सातपुते यांचे हस्ते दिपप्रज्वलन व ग्रंथपुजन करून झाले.सौ.सुप्रिया लिमये यांनी शारदास्तवनाने मंगलमय सुरूवात केली. बालशाहिर कुमार आरूष याने नसानसात नवचैतन्य निर्माण होईल असा पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. प्रास्ताविक भाषणात संस्थापक अध्यक्षा प्रिया दामले यांनी त्यांच्या बाबांच्या म्हणजेच स्व.प्रमोद दामले यांच्या नाट्य व चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीचा आढावा घेत तितिक्षा इंटरनॅशनलचा उगम व आगामी काळातील उद्दिष्टे तसेच तितिक्षा आंतरराष्ट्रीय बहुभाषिक साहित्य संमेलन २०२३ जाहिर केले.
” प्रतिभावंतांमधे समाजाला जीवनाचा आनंद मार्ग
दाखवण्याची क्षमता असल्याने त्यांनी आपल्या शाश्वत निर्मितीसाठी सामाजिक समरसतेला अधिक प्राधान्य द्यावे ” असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग सल्लागार समिती सदस्य ॲड.चरणजीतसिंग साहनी, विश्वसुंदरी डाॅ.प्रचिती पुंडे , सामान्यातही असामान्य व्यक्तिमत्त्व श्री.शैलेश बडदे ,
अर्बन प्लॅनर अश्मिली जाधव , ज्येष्ठ साहित्यिक मंदाताई नाईक, शलाका भालेराव
गुलाबसम्राट बाबा ठाकूर , तितिक्षा मंदाश्री काव्यगौरव प्राप्त श्री.विजय जोशी , रंगकर्मी श्री.सतीश इंदापूरकर आदि मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक अरुण देशपांडे यांना तितिक्षा साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. संमेलनात सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते भरत जाधव यांना तितिक्षा इंटरनॅशनल तर्फे संस्थापक-अध्यक्षा प्रिया प्रमोद दामले यांच्या उपस्थितीत
तितिक्षा हास्यगौरव (दादा कोंडके स्मृती) पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाट्य व चित्रपट क्षेत्रात मानधनापेक्षा असा मिळालेला पुरस्कार जास्त आनंद देतो असे भरत जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.
नाट्य आणि चित्रपटात
हास्याभिनयाबरोबरच निर्मितीचाही आनंद घेतला
असून आगामी काळात एका नाटकात आव्हानात्मक गंभीर भूमिका करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भरत जाधव
यांच्या धावत्या भेटीचा उपस्थित रसिकांनी भरभरुन आनंद घेतला. सर्वोत्कृष्ठ सामाजिक संस्था म्हणून शांतिदूत परिवार या संस्थेस सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार शांतिदूत संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव आणि संस्थेचे मार्गदर्शक निवृत्त पोलीस महासंचालक
श्री.डाॅ.विठ्ठलराव जाधव यांनी स्विकारला. साहित्य कला , सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाजिक आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांना तितिक्षाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्याताई पेठे , श्री.व सौ.वीणा रारावीकर , डॉ.शंतनू अभ्यंकर ,तितिक्षा प्रमोद नाट्यगौरव पुरस्कार प्राप्त नाट्यअभिनेत्री नीता दोंदे , डॉ.प्रचिती पुंडे , सपना पाटसकर
श्री.दत्तप्रसाद जोग , श्री.प्रशांत डोंगरे ,सौ.तृषाली जाधव ,
श्री.तुषाल शिवशरण ,कु.आरूष दाढे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साहित्य पुरस्कारामधे साहित्यरत्न आणि साहित्य रत्नाकर तसेच विविध क्षेत्रात तितिक्षा ग्रंथपुरस्कार देण्यात आले. कादंबरी क्षितीज आणि किनारा , बालसाहित्यात बाल कादंबरी मिन्नीचं घर उन्हात आणि बालकवितासंग्रह अरे अरे ढगोबा विशेष भावले.
निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात कवी महादेव लांडगे ,
कवी योगेश हरणे, कवी अरुण गांगल, श्रीशैल्य सुतार , प्रतिभा गजरमल , प्रतिभा पोतदार
आदिंच्या कवितांनी उत्स्फूर्त
दाद मिळवली. कार्यक्रमाचे
संयोजन चैताली अगरवाल,
अजिता व अजया मुळीक यांनी केले. सुत्रसंचालन सौ.सुवर्णाताई जाधव आणि नीना देसाई यांनी केले . उशीरा सुरू होऊनही या ऐतिहासिक संमेलनाची सांगता नियोजनबद्ध झाली.
संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————