You are currently viewing गुरू माऊली

गुरू माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री राजश्री राजन कांबळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरू माऊली* 

 

गुरू माझा गजानन

त्यासी करून वंदन

करि तयाचे स्तवन

हेच गुरूचे पूजन

 

गुरू करि देखभाल

जशी गाईची गोपाल

नसे उणीव कशाची

भेट मिळे ही मायेची

 

साथ देई गजानन

जणू करितो रक्षण

नाही फुकाचा दिखावा

जन्म सार्थकी लावावा

 

जरी होय नाही भेट

नाम घेता यई थेट

उभा सामोर राहून

देई साक्षात दर्शन

 

अशी माझी ही माऊली

जशी मायेची सावली

दयाघना रे ओंकार

करी भक्तांचा उद्धार

 

राजश्री कांबळे, ऑस्ट्रेलिया

३/७/२०२३

प्रतिक्रिया व्यक्त करा