You are currently viewing शहरातील पाणी पुरवठा ९ व १० तारखेला राहणार खंडीत..

शहरातील पाणी पुरवठा ९ व १० तारखेला राहणार खंडीत..

सावंतवाडी

शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या चिवारटेकडी येथील पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार असल्यामुळे ९ व १० तारखेला शहरातील पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे. त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. याबाबतची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली असून नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. यात सबनिसवाडा, बाहेरचावाडा, काजरकोंड, सिक्वेरा अवाट, लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाज मंदीर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, वझरवाडी, नाडकर्णी पाणंद, चराठा ग्रामपंचायत आदींचा समावेश आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा